Pregnancy च्या वेळी महिलांनी Diet वर खास लक्ष द्या!
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : VideoBlocks)

गर्भावस्थेतील महिलेला दुप्पट पटीने अन्न खावेसे वाटते. कारण या अवस्थेत फक्त महिलाच नाही तर तिच्या बाळालासुद्धा पुरेशा प्रमाणात आहार मिळावा हा समज असतो.त्यामुळे गर्भावस्थेतील महिलेच्या बाळाची दिवसागणिक वाढ होत जाते. त्यानुसार महिलांना पोषक असा आहार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो.

तसेच खाण्याच्या बाबतीतही योग्य ती काळजी घेतल्याने बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गर्भावस्थेतील महिलांनी 'या'  खास Diet चे पालन करणे आवश्यक आहे.

- गर्भवती महिलेने आहारामध्ये पालेभाज्या, फळे, दूध, मांसाहार आणि विविध प्रकारच्या डाळींचे सेवन करावे.

- थोड्या थोड्या वेळाचे अंतर ठेवून पौष्टिक पदार्थांचे खावेत.

-तसेच शरीरासाठी आवश्यक तेवढे पाणी प्यावे.

-मांसाहार, भाज्यांचे सेवन, दूध आणि फळे यांच्या आहारात समावेश करावा. यामधून प्रोटीन जास्त प्रमाणात मिळते आणि शरीराला ऊर्जेचा पुरवठा केला जातो.

-गर्भावस्थेतील महिलेने दिवसातून कमीत कमी तीन कोणत्याही प्रकारची तीन फळे खाणे आवश्यक आहे. तसेच पालेभाज्यांचा प्रामुख्याने आहारामध्ये समावेश करावा.

-जास्त गोड पदार्थांचे सेवन करणे टाळावे. त्यामुळे रक्तातील साखर वाढून पाय दुखण्याची शक्यता असते.

-गर्भावस्थेतील महिलांनी अल्कोहोलचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. नाहीतर बाळाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.