मुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स
Mumbai Temperature (Photo Credits: Pixabay)

यंदा मार्च महिन्याच्या अखेरीलाच मुंबईकरांना उन्हाळ्याच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. मागील 24 तासामध्ये मुंबईचं तापमान 3.6 डिग्रीने वाढलं आहे. मागील आठवड्याभरापासून वातावरणात होणार्‍या बदलांमुळे तापमान वाढतं आहे. एकूण आठवड्याभरात 9.5 डिग्रीने उष्णता वाढला आहे. सध्या मुंबईचं तापमान 40 अंश सेलियल्सच्या आसपासचं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या हवेमध्ये आर्द्रता 26% सांताक्रुझ तर कुलाबामध्ये 45% ची नोंद आहे. मुंबई शहराला मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा

मागील वर्षी 26 मार्चच्या आसपास मुंबईचं तापमान 41 अंशावर पोहचलं होतं. मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान 28 मार्च 1956 दिवशी 41.7 इतके होते.हवेतील आर्द्रता कमी होणं आणि उष्णता वाढणं हे आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचं आहे. सामान्यतः प्रखर उन्हात बाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो. मात्र कामानिमित्त अनेक मुंबईकरांना उन्हातान्हात फिरणं अटळ आहे. अशावेळेस डीहायड्रेशनचा त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचे आहे. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने काही खास टीप्स नक्की ठेवा.

डीहायड्रेशनपासून दूर राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल?

उष्णतेमुळे घामातून केवळ पाणी नव्हे तर क्षार घटकही बाहेर पडतात. त्यामुळे केवळ पाणी पिणं पुरेसे नाही. उन्हाळ्याच्या पाण्यासोबतच आहारातील पदार्थांचीही योग्य निवड करणं आवश्यक आहे. त्यामधून शरीराला पुरेसे पोषण आणि पाण्याचा अंशदेखील नैसर्गिकरित्या मिळतो.

  1. काकडी – काकडीमुळे शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते. काकडीत 95% पाणी असल्याने शरिरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
  2. कलिंगड - उन्हाळ्यात बाजारात हमखास दिसणारं एक फळ म्हणजे कलिंगड. पाण्यासोबत नैसर्गिक स्वरूपात साखर असल्याने हे फळ फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरोग्याला फायदेशीर आहे.
  3. टोमॅटो - उन्हाळ्यात भूक मंदावलेली असते त्यामुळे जड आहारापेक्षा सॅलॅड खाण्याचा पर्याय निवडणार असाल तर काकडीसोबत टोमॅटोचा समावेश करा. यामध्ये 94% पाण्याचा अंश असतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीराला पाण्याचा पुरवठा होतो.
  4. दही - शरीराला थंडावा देणारा पोषक पदार्थ म्हणजे दही. दही ताक, छास, लस्सी अशा विविध आणि चविष्ट माध्यमातून खाता येतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात दह्याचा आहारात नक्की समावेश करा.
  5. सिमला मिरची - हिरवी आणि रंगीत सिमला मिरची दिसायला आकर्षक आणि चविष्ट असल्याने तुम्हांला खास रेसिपी बनवायची असेल, सॅलॅड ट्राय करायचं असेल तर सिमला मिरचीचा आहारात समावेश करा. यामधील पाण्याचा साठा उन्हाळ्यात आरोग्यवर्धक आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे डीहायड्रेशन, हीट स्ट्रोक (उष्माघात) यांचा त्रास होतो. हे आजार वर पाहता साधे वाटत असले तरीही अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसात हे जीवावर बेतू शकतं.