Mouth Rash COVID 19 Symptom: तोंडात रॅश हे कोविड 19 चं संभाव्य लक्षण, अधिक अभ्यासाची गरज; स्पेन संशोधकांचा दावा
Mouth Rash COVID 19 Symptom | Photo Credit: Pixabay.com

जगभरामध्ये दहशत पसरवणारा कोरोना व्हायरस आणि त्याच्यामुळे होणारा कोविड 19 हा आजार दिवसागणिक सामान्यांमध्ये भीती वाढवत आहे. या आजाराबद्दल जगभरात जसजसं संशोधन वाढत आहे तशी नवनवी माहिती समोर येत आहे. आता स्पॅनिश डॉक्टरच्या माहितीनुसार कोविड 19 च्या रूग्णांमध्ये तोंडात रॅशेस दिसतात. दरम्यान हे कोविड 19 च्या लक्षणांमधील संभाव्य लक्षण आहे आणि अजून त्याबद्दल अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र त्वचेवरील रॅशेस सोबतच enanthem म्हणजेच तोंडातील नाजूक त्वचेवर दिसणारे रॅशेस देखील कोविड 19 चे संकेत देतात असा निष्कर्ष आता पुढे येत आहे. Coronavirus केवळ फुफ्फुसांवर नव्हे तर मेंदू, हृद्य, किडनी सह शरीराच्या अन्य अवयवांवरही करतो घातक परिणाम; पहा COVID-19 चा रूग्णांच्या शरीरावर होणार्‍या गंभीर परिणामांबद्दल संशोधकांचा अभ्यास काय सांगतो

तोंडातील रॅशेस - कोविड 19 चे नवं लक्षण ?

मेडिकल रिपोर्ट्स नुसार, JAMA Dermatology ने 15 जुलै दिवशी प्रकाशित केलेल्या एका अहवालामध्ये COVID-19 च्या नव्या लक्षणाची माहिती दिली आहे. त्यांच्यामते, enanthem हे कोविड 19 चं लक्षण असू शकतं. तोंडातील नाजूक त्वचेवर येणार्‍या रॅशेसला क्लिनिकल भाषेमध्ये enanthem म्हणतात. हे लक्षण कोविड 19 सारख्या व्हायरल इंफेक्शन मध्ये दिसू शकतं.

Dr. Juan Jimenez-Cauhe यांनी स्पेनच्या माद्रिद मध्ये University Hospital Ramon y Cajal येथे 21 कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची पाहिणी केली. यामध्ये 6 रूग्णांमध्ये त्यांच्या तोंडात रॅशेस आढळले. दरम्यान या रूग्णांचे वय 40 ते 69 वर्षामधील होते. यासोबतच ज्या रूग्णांमध्ये रॅशेस आढळले त्यापैकी 4 महिला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या निष्कर्षानंतर या लक्षणाबद्दल आता अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रूग्णामध्ये तोंडात रॅश दिसण्याचा कालावधी आबि स्वरूप वेगवेगळे असू शकते. enanthem हे कोविड 19 च्या रूग्णाला दिल्या जाणार्‍या औषधाची रिअ‍ॅक्शन नसल्याचं या अहवालात स्पष्ट झाले आहे. Coronavirus New Symptoms: कोरोना संसर्गाची आणखी 3 नवीन लक्षणे, कोविड-19 लक्षणांच्या यादीमध्ये CDC ने केला समावेश.

कोविड 19 हा आजार चीन मध्ये डिसेंबर 2019 पासून दिसायला सुरूवात झाली आहे. आज जगात असा एकही देश नाही जिथे हा आजार पोहचला नाही. सध्या या आजाराने थोड्या फार फरकाने सार्‍याच जगाला ग्रासले आहे. अमेरिकेमध्ये सध्या या आजाराचे सर्वाधिक रूग्ण आहेत. भारतामध्येही रूग्णसंख्येने आता 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. अद्याप कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी ठोस औषध किंवा लस नाही. जगभरात कोविड 19 विरूद्धच्या लसीसाठी संशोधन सुरू आहे. येत्या 5-6 महिन्यात ती मिळण्याची आशा आहे