Health Tips: हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर करा 'हे' त्वरित उपाय जे एखाद्याचे जीवन वाचविण्यास येऊ शकतात कामी
Heart Attack (Photo Credits: PixaBay)

सध्याचे बदलते हवामान, प्रदूषण, बदलती जीवनशैली याचा आपल्या शरीरावर विपरित होताना दिसून येत आहे. त्यात बदलते अतितणाव, जेवणाची आणि झोपण्याची वेळ बदलणे याचाही आपल्या शरीरावर परिणाम होतो. परिणामी या त्रासातून जाणा-यांपैकी कित्येकांना हृदयविकार होण्याची चिन्हे असतात. किंबहुना अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्याचे कारणंही अनेकदा हिच असतात. अशावेळी हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर त्वरित उपाय झाल्यामुळे व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

आपल्यासमोर जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर अशा वेळी काय करावे हे कित्येकांना अनेकदा माहित नसते किंवा अनेकदा अशी घटना पाहिल्याने समोरचा व्यक्ती पूर्णपणे गोंधळून जातात. पण तुम्हाला माहित आहे का अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीवर खाली दिलेले महत्त्वाचे उपाय केल्यास कदाचित त्या व्यक्तीला जीवदानही मिळू शकेल.

पाहा कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी:

1) हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळतं. अशावेळेस त्या रुग्णाला झोपवून एका कडेवर वळवा. असं केल्याने त्याला मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तिव्रता कमी होते. तसंच फुप्फुसांना नुकसान होत नाही.

2) पल्स रेट कमी जास्त होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. यामुळ पायाकडचा रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असं केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो.

3) रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसंच जिने चढणं-उतरणं टाळावं.

4) रुग्णाभोवती जास्त गर्दी करू होणार नाही याची काळजी घ्या. त्याला पुरेशी हवा मिळेल नीट श्वास घेता येईल याची काळजी घ्या. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट यापैकी कोणतीही एक गोळी रुग्णाला द्यावी.

5) रुग्णाच्या मानेजवळ हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर तो 60 ते 70 पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतोय आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असं समजून तात्काळ रुग्णालयात हलवा.

शेवटी आपण डॉक्टर नाही. हृदयविकारावर योग्य इलाज जरी डॉक्टर करू शकत असले तरी रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्या रुग्णावर त्वरित उपाय केल्यास त्याला काही वेळा साठी जीवदान मिळू शकते.

Health Benefits Of Walnuts: अक्रोड खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? Watch Video 

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)