Feet Care Tips: दिवसभर शूज घातल्यामुळे पायाला येणारा दुर्गंध टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या टीप्स

अनेकांना सर्वच दररोज शूज घालायची सवय असते. त्यामुळे दिवसभर शूज घातल्याने आपल्या पायांची दुर्गंधी येते. या दुर्गंधीमुळे आपल्याला अनेकदा डोकदुखीसारखा त्रासही होतो. अनेकदा पाय धुऊनदेखील पायांचा दुर्गंध येत राहतो. या दुर्गंधीला तुम्ही कंटाळले असाल आणि तुम्हाला या समस्येपासून बचाव करायचा असेल तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल.

Feet Care Tips: दिवसभर शूज घातल्यामुळे पायाला येणारा दुर्गंध टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या टीप्स
Smelly Feet (PC-Twitter)

Feet Care Tips: अनेकांना सर्वच दररोज शूज घालायची सवय असते. त्यामुळे दिवसभर शूज घातल्याने आपल्या पायांची दुर्गंधी (Smelly Feet) येते. या दुर्गंधीमुळे आपल्याला अनेकदा डोकदुखीसारखा त्रासही होतो. अनेकदा पाय धुऊनदेखील पायांचा दुर्गंध येत राहतो. या दुर्गंधीला तुम्ही कंटाळले असाल आणि तुम्हाला या समस्येपासून बचाव करायचा असेल तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल.

अनेकदा ऑफिसमध्ये शूज काढल्यानंतर दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमुळे सर्वांनाच त्रास व्हायला सुरुवात होते. या समस्येपासून कायमची सुटका करण्यासाठी खालील टीप्स तुमच्या नक्की कामी येतील. चला तर मग पाहुयात काय आहेत या टीप्स...(हेही वाचा - Winter Health Tips: हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होतील 'हे' फायदे)

तळपायांची दुर्गंधी टाळण्यासाठी करा 'हे' उपाय -

  • आपण अनेकदा ऑफिसला जाताना शूज घालतो. त्यामुळे हे शूज दिवसभर आपल्या पायांत राहतात. यामुळे आपल्या पायांना घाम येतो आणि दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. ही समस्या दूर करण्यासाठी आपले पाय अँटी बॅक्टेरिअल साबणाने नियमीत धुवा. पाय धुताना पायांच्या बोटांमध्ये घाण राहणार नाही याची काळजी घ्या. पायाच्या बोटांमध्ये घाम आल्याने आपल्या तळपायाची दुर्गंधी येते असते.घरी गेल्यानंतर दिवसभर घातलेल्या शूजमध्ये सॉक्स ठेऊ नका. त्यामुळे सॉक्सला शूजचा दुर्गंध बसण्याची शक्यता असते.
  • तसेच दररोज नवीन सॉक्सचा वापर करा. त्यामुळे तुमच्या तळपायांची दुर्गंधी येणार नाही.शूजमध्ये टी बॅग ठेवल्याने दुर्गंधी कमी होते. टी बॅगमुळे शूजमधील दुर्गंधी शोषली जाते. परिणामी पायांचा वास येत नाही.
  • शूज घालण्याअगोदर आपले पाय कोरडे करून घ्या. पाय कोरडे झाल्यानंतर शूड घाला.प्रत्येक वेळी कोरडे सॉक्स घाला. ओले सॉक्स घातल्याने पायांची अधिक दुर्गंधी येते. त्यामुळे ओले सॉक्स घालू नका.
  • तसेच शक्य असल्यास ऑफिसमध्ये दोन ते तीन वेळा शूज काढा. असे केल्याने पायांना आलेला घाम कमी होतो आणि पायांची दुर्गंधी येत नाही.

वरील सर्व उपाय करून तुम्ही आपल्या पायाची दुर्गंधी रोखू शकता. तसेच याव्यतिरिक्त दररोज लव्हेंडर तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्यास तळपायांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2019 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).