![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/12/sex-380x214.jpg)
सामान्यतः असे सांगितले जाते की, रात्री झोपताना तुम्ही सैल, आरामदायक किंवा ढगळे कपडे घालून झोपले पाहिजे. घट्ट कपड्यामुळे तुम्हाला झोपेची समस्या उद्भवू शकते. मात्र रात्री ब्रा (Bra) सारखी गोष्ट घालून झोपण्याबाबत मतांतरे आहेत. काही स्त्रियांना रात्री ब्रा घालून झोपायला आवडते, तर काही स्त्रिया ब्रा काढून झोपणे पसंत करतात. मात्र, हे बर्याच संशोधनात समोर आले आहे की, रात्री ब्रा घालून झोपल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. जर आपणही रात्री ब्रा घालून झोपत असाल तर आपल्याला आपली सवय बदलावी लागेल. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत, रात्री ब्रा घालून झोपल्याने नेमक्या काय समस्या उद्भवू शकतात.
ब्लड सर्कुलेशनवर परिणाम होतो -
आजकाल बर्याच स्त्रिया अंडरवेअर ब्रा घालणे पसंत करतात, परंतु रात्री तुम्ही या प्रकारची ब्रा घालून झोपत असाल तर वेळीच सावध व्हा. अशा प्रकारच्या ब्रामुळे स्तनांच्या जवळच्या भागाचे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होऊ शकते. स्तनांच्या सभोवतालचे स्नायू संकुचित होतात आणि मज्जासंस्थेसदेखील हानी पोहचू शकते. म्हणूनच रात्री आपण ब्रा काढून झोपणे केव्हाही फायद्याचे ठरते.
झोपेच्या समस्या उद्भवू शकतात -
रात्री आपल्याला आरामदायक आणि शांत झोप हवी असेल तर ब्रा काढून झोपणे हा केव्हाही उत्तम पर्याय आहे. रात्री ब्रा घालून झोपल्याने आपण खूप अस्वस्थ राहतो, झोपेत सतत चुळबुळ चालू असते, ज्याचा परिणाम आपल्या शांत झोपेवर होऊ शकतो.
जास्त घाम येऊ शकतो -
दिवसभर ब्रा घालण्यामुळे ब्रेस्ट एरियामध्ये जास्त प्रमाणात घाम येतो. अशा परिस्थितीत जर आपण रात्री ब्रासह झोपी गेलात तर यामुळे अति घाम व त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते. विशेषत: पॉलिस्टरसारख्या कृत्रिम वस्तूंनी बनवलेल्या फॅन्सी ब्रा घालून झोपणे टाळले पाहिजे. अशा ब्रामध्ये खूपच जास्त घाम येतो.
खाज सुटणे -
रात्री आपण ब्रा परिधान करून झोपल्यास ब्राचे हुक आणि पट्ट्या आपल्या त्वचेवर परिणाम करतात. रात्री ब्रा घालून झोपल्यास त्वचेला खाज सुटू शकते. इतकेच नव्हे तर बर्याच काळासाठी ब्रा घालण्यामुळे स्तनात गांठ तयार होण्याची शक्यता वाढते. (हेही वाचा: Winter Health Tips: हिवाळ्यात कोणता आहार आहे तुमच्या शरीरास हितवर्धक, जाणून घ्या सविस्तर)
स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो –
रात्री ब्रा घालून झोपल्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसला तरी, ब्रा घालून झोपणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. रात्री वायरवाले फॅन्सी ब्रा घातल्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते, म्हणून रात्री ब्रा काढून झोपणे केव्हाही चांगले.
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)