प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

थंडी (Winter) म्हटली की मस्त वाफळता चहा, गरमागरम भजी, थोडक्यात उष्ण गोष्टी खाव्याशा वाटतात. तर काहींना याउलट थंडीत आईस्क्रीम खावेसे वाटते. थंडीत वातावरणात अचानक गारवा आल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होतो. तसेच तुमचे पोट थंड राहत असल्याकारणाने सतत भूक लागते. अशा वेळी थंडीत योग्य आहार करणे गरजेचे आहे. अन्यथा शरीरावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. थंडीत तुमचा आहार, जेवणाच्या वेळा योग्य असणे गरजेचे आहे. मात्र नेमका कशा पद्धतीचा आहार असावा याची अनेकांना माहिती नसते. काय खावे वा काय खाऊ नये हे सूचत नाही. कोणत्या भाज्या, कोणती, फळे खावीत याविषयी मनात प्रचंड प्रश्न निर्माण झालेले असतात.

अशा वेळी तुम्ही हिवाळ्यात कशा पद्धतीचा आहार घ्यावा ही सांगणारी माहिती तुम्हाला या लेखातून मिळू शकते. तसं थंडीत कोणतीही गोष्ट आपल्याला सहज पचते. त्याला मुख्य कारण वातावरणात निर्माण झालेला गारवा हे आहे. तरीही काही ठराविक पद्धतीचा आहार तुमच्या शरीरास हितवर्धक ठरू शकतो.

भाज्या

थंडीत मेथी पालक, शेपू यांसारख्या पालेभाज्या खाव्यात. तर शेंगा, पडवळ, भोपळा यांसारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश असावा.

कडधान्य

थंडीत मूग, मटकी, तूर, उडिद, चवळी, वाल ही कडधान्ये खावीत.हेदेखील वाचा- Winter Lips Care Tips: थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

मांसाहार

थंडीत मासे, चिकन, मटन, अंडी यांसारखा मांसाहार देखील शरीरास चांगला असतो.

मसालेदार पदार्थ

थंडीत हवामान पोषक असल्या कारणाने हिंग, धने, जिरं, तिरफळ, तेजपत्ता यांसारख्या मसाल्यांपासून बनवलेले पदार्थ खावेत.

उष्ण पदार्थ

काजू, बदाम, पिस्ता हे सुकामेवा उष्ण असतात. पण थंडीत हा सुकामेवा शरीरास आरोग्यदायी असतो.

थोडक्यात उन्हाळा किंवा पावसाळ्यात आपण ज्या ज्या गोष्टी खाणे टाळतो त्या त्या सर्व गोष्टी आपण थंडीत खाऊ शकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहतो आणि सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतो.