Winter Lips Care Tips: थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Winter Lips Care Tips (Photo Credits: PixaBay)

हिवाळा (Winter) म्हटलं की त्वचा रुक्ष होणे, कोरडी पडणे यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्वचेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. थंडी आली की आपण लगेच विकतचे केमिकलयुक्त उत्पादनं घरी आणतो. पण त्याजागी तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांनी तुमची त्वचा मुलायम करु शकता. थंडीत त्वचेसह ओठांवरही (Lips) कोरडेपणा येतो. ओठं फाटतात. त्यामुळे त्याची योग्य काळजी न घेतल्यास ओठांतून रक्त देखील येते. म्हणून अशा वेळी झटपट घरगुती उपायांनी तुम्ही कोरडे पडलेले ओठ छान मुलायम आणि गुलाबी करु शकता.

गुलाबी ओठांसाठी तूप हा सर्वात चांगला उपाय आहे. तूप ओठाला लावल्यास ते नरम पडतात. तसेच तुम्ही तुप लावल्यावर तुम्ही काही खाल्लास तूप शरीरात गेल्यास काही अडचण नाही. कारण ते पौष्टिकच असते. त्याचसोबत ओठांची काळजी घेण्यासाठी आणखी काही घरगुती उपाय:

1) 1चमचा दूध आणि 1 चमचा मध एकत्रित करुन हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यास हे मिश्रण ओठांवर हलक्या हाताने लावा.

2) दिवसातून 2-3 वेळा ओठांवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना काहीसा आराम मिळतो.हेदेखील वाचा- Advantage Of Methi Seeds : मेथीच्या दाण्याचे 'हे' उपयुक्त फायदे तुम्हाला माहीत आहेत का ? 

3) फाटलेल्या ओठांवर दररोज 2-3 वेळा मध लावावे. थोडसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावं.

4) हिवाळ्यात हलके पदार्थ खावेत आणि पाणीही भरपूर प्यावे. याने ओठांचा मुलायमपणा टिकून राहतो.

5) तसेच खोबरेल तेलही ओठांवर रामबाण उपाय ठरु शकते. मात्र हे खोबरेल तेल रोज रात्री झोपताना ओठांना लावावे आणि सकाळी उठल्यावर हे ओठं स्वच्छ धुऊन घ्यावे. ओठ छान मुलायम आणि गुलाबी होतात.

लक्षात ठेवा थंडीत ओठ तेव्हाच चांगले राहील जेव्हा त्यात रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहील. यासाठी ओठांचा अलगद हाताने अधूनमधून हातांनी मसाज करावा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहील.