नोव्हेंबर महिना सुरु झाला असून हळूहळू थंडी पडायला ही सुरुवात झाली आहे. अशा वेळी लोकांना गरम गोष्टी जास्त खाव्या वाटतात. त्यात अंडी, आल्याचा चहा यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहेत ज्या हिवाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहेत आणि थंडीत पचायलाही हलक्या असतात. यात आणखी एक गुणकारी पदार्थ म्हणजे आलं-लसणाचं लोणचं (Ginger Garlic Pickle). आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लोणचं हे सर्वसाधारण आंबट असते मग थंडीत असा आंबट पदार्थ खाल्ल्याने सर्दी होऊ शकते. मात्र तसे काही नसून ज्या लोणचं प्रेमींनी थंडीतही लोणच्यावर ताव मारायचा असेल त्यांना आलं-लसणाचं लोणचं खूप फायदेशीर ठरेल.
आलं आणि लसूणात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आल्यामुळे रक्तातील चरबी कमी होते, भूक वाढते, सर्दी-खोकला यांसारख्या आजारांवर देखील गुणकारी आहे. तर लसूण उच्च रक्तदाब, पचनक्रिया, हृद्यरोग, त्वचेचे विकार यांसारख्या आजारांवर उपयुक्त आहे. त्यामुळे अत्यंत उपयोगी असलेल्या आलं-लसणाचं लोणचं थंडीत खाल्ल्यास शरीरासाठी किती फायदेशीर ते पाहूया.
1. दररोज हे लोणचं खाल्ल्याने हाडं मजबूत होतात.
2. सांधेदुखी आणि सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो.
3. डायबिटीसच्या रुग्णांसाठी आलं-लसणाचं लोणचं अत्यंत फायदेशीर ठरु शकते.
4. थंडीत शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हे लोणचं उपयुक्त ठरते.
5. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
हेदेखील वाचा- सावधान! आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ 5 तोटे तुम्हाला माहित आहेत का ?
आलं-लसूण हे एक नैसर्गिक अॅन्टीसेप्टिक असल्यामुळे प्रदूषणामुळे उद्भवणा-या समस्यांवरीह आलं-लसणाचं लोणचं गुणकारी ठरू शकते. म्हणून हिवाळ्यात अन्य लोणची खाण्यापेक्षा आलं-लसूणाचे लोणचे खाणे फायदेशीर ठरु शकते.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. आल्याचा चहा घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)