HIV-AIDS (Photo Credit: Pixabay)

अमेरिकेमध्ये Leukaemia या आजाराशी लढणारी एक महिला ही जगातील पहिली महिला आणि तिसरी व्यक्ती ठरली आहे जिने HIV वर मात केली आहे. HIV वायरस मुळे एड्स होतो. दरम्यान stem cell transplant नंतर तिच्यामध्ये हा बदल झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये झालेल्या Conference on Retroviruses and Opportunistic Infections (CROI) च्या प्रेझेन्टेशन मध्ये संशोधकांच्या रिपोर्ट्सनुसार, मागील 14 महिन्यांमध्ये या महिलेला एचआयव्ही चे निदान झालेले नाही.

स्टेम सेल्स मध्ये एक क्षमता असते ज्यात सेल स्पेशलाईज्ड सेल टाईप्स बनतात. सध्या ही जगातील तिसरी अशी केस आहे ज्यात रूग्णाने स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट नंतर एचआयव्हीला दूर ठेवले आहे. ही माहिती National Institutes of Health ने त्यांच्या पत्रकामध्ये म्हटली आहे.

पहिल्या दोन रूग्णांमध्येही stem cell transplant नंतर HIV दूर ठेवता आला होता. महिलेशी निगडीत उपचारांमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉ. इव्हॉन ब्रायसन आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टिमोरचे डॉ. डेब्रा परसॉड यांच्या नेतृत्वाखाली हे उपचार पार पडले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एचआयव्हीविरूद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीनं हे स्टेमसेल दान केले होते. जाणून घ्या HIV बद्दलचे गैरसमज.

सेंट्रल डिसीज ऑफ कंट्रोल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत 12 लाख पेक्षा अधिक एचआयव्ही बाधित आहेत. ही महिला देखील त्यांच्यापैकी एक होती. 2013 मध्ये तिला एचआयव्ही ची लागण झाल्याचं सांगण्यात आलं होतं. नंतर कॅन्सरनेही तिला जडलं. मग यापूर्वी एचआयव्ही वर मात केलेल्या दोन पुरूषांच्या बोन मॅरोमधून मिळवलेल्या स्टेम सेल्स द्वारा उपचार करण्यात आले.