रिकामीपोटी खाऊ नका ही 5 फळे, शरीरावर होतील दुष्परिणाम
Fruits (Photo Credits: PixaBay)

फळे ही शरीरासाठी पौष्टिक तशीच फायदेशीर असतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मात्र ही फळे खाताना ब-याच गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. कारण फळे ही शरीरासाठी चांगली असतात म्हणून आपल्यापैकी बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या फळे खातात. मात्र रिकामीपोटी फळे खाल्ल्याने शरीरावर बरेच दुष्परिणाम होऊ शकतात. असे केल्याने फळांचे फायदे होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. विशेषत: सर्व फळांमध्ये काही ना काही विशेष पदार्थ असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र यात काही फळे अशी आहेत जी उपाशीपोटी खाल्ल्याने तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात.

चला मग जाणून घेऊया कोणती आहेत 5 फळे जी रिकामीपोटी कधीच खाऊ नये.

1. केळं (Banana)

केळं हे आरोग्यासाठी खूपच गुणकारी असतात. मात्र रिकामीपोटी केळं खाल्ल्याने शरीरावर खूपच विपरित परिणाम होऊ शकतात. केळ्यामध्ये मॅग्नेशिअमची मात्रा अधिक असते, त्यामुळे रिकामीपोटी मॅग्नेशिअम झपाट्याने रक्तात वाढत जातो. रक्तात मॅग्नेशिअमचे प्रमाण वाढल्याने हृद्यावर त्याचा विपरित परिणाम होतो.

2. आंबा (Mango)

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा लोक बरीच आवडीने खातात. मात्र रिकामेपोटी आंबा खाल्ल्यास शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. खरे पाहता, आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि रिकामीपोटी आंबा खाल्ल्याने साखरेचे प्रमाण भराभर वाढत जाते. ज्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो.

3. नास्पती (Pears)

फायबरयुक्त असलेले नास्पती फळ हे शरीरासाठी खूप चांगले आणि पचन्यास उत्तम असे आहे. मात्र रिकामेपोटी हे फळं खाल्ल्याने फायबर पोटात नाजूक अवयवांना नुकसान पोहचवू शकतो. जेणे तुमच्या पचनक्रियेवरही परिणाम होतो.

4. लिची (Litchi)

चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असे लिची फळ रिकामीपोटी खाणे शरीरासाठी खूपच घातक आहे. असे केल्यास तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. ज्याने तुम्हाला गॅस आणि पचनक्रियेसंबंधी समस्या निर्माण होतात.

5. द्राक्षं (Grapes)

द्राक्षं रिकामीपोटी खाल्ल्याने गॅस्ट्रिक अल्सर आणि पोटात जळजळ निर्माण होण्याच्या समस्या निर्माण होतात.

हेही वाचा- Monsoon Health Tips: पावसाळ्यात ही 5 फळे खाल्ल्याने आजारापासून होईल बचाव

फळांमध्ये असलेली पोषकतत्त्वे तुम्हाला मिळण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की रिकामीपोटी अशा फळांचे सेवन करु नका. तसेच ती केव्हा आणि कशी घेतली पाहिजे याचा नीट अभ्यास करा. विशेषकरुन वरील 5 फळे रिकामीपोटी न घेतलेलीच बरी.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)