सावधान! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दारु, तंबाखूचे सेवन करणे आता पडेल महागात; कारण घ्या जाणून
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट संपूर्ण जगावर वावरत आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूचा 170 अधिक देश सामना करत आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने संपूर्ण देशात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घरातच राहण्याशिवाय पर्याय नाही. कोरोना विषाणूसंदर्भात प्रत्येकाच्या मनात भितीनिर्माण झाली असून दारू (Alcohol) आणि तंबाखूचे (Tobacco) सेवन कराणाऱ्यांना याचा अधिक धोका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministery Of Health) दिली आहे. दारु आणि तंबाखूचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते. तसेच यामुळे संबंधित व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी एका ऑनलाईन पुस्तिकाची उपलब्धता करून दिली आहे. यातून त्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांसाठी नुकतीच इंटरनेटवर‘Minding our minds during the COVID-19 pandemic’ नावाची पुस्तिका उपलब्ध केली आहे. या पुस्तिकात नागरिकांसाठी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, नकारात्मक भावनांपासून स्वतःला दूर ठेवा. यासाठी आवडते संगीत ऐका, पुस्तकांचे वाचन करा, टिव्हीवर मनोरंजनाचे कार्यक्रम बघा. त्याचबरोबर पेंटिग्ज बनवणे, बागकाम करणे किंवा कपडे शिवणे असे तुमचे जुने छंद असतील तर, पुन्हा ते सुरु करा. याद्वारे मागे पडलेल्या तुमच्या छंदांचा पुन्हा एकदा शोध घ्या, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय, या पुस्तिकमध्ये अशा काही टिप्स दिल्या आहेत. ज्यामध्ये सोशल डिस्टंसिंगमुळे चिंता आणि ताण निर्माण होत असल्यास त्यावर कशी मात करावी याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानुसार, जे करोनाबाधीत आहेत, त्यांच्याबाबत आपले चुकीचे मत बनवू नका, असे आवाहन या पुस्तिकेतून नागरिकांना करण्यात आले आहे. कारण, असा रुग्ण या आजारातून जरी बरा झाला असला तरी इतरंच्या वागणुकीमुळे त्याच्या मनावर ताण येऊ शकतो, अशी माहिती लोकसत्ताने दिली आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या 3 दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 93 कोटी जमा

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 8 लाख 57 हजार वर पोहचली आहे. यांपैकी 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 78 हजार रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 251 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 321 वर पोहचली आहे. यात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.