COVId 19 New Symptoms: सतत उचकी सह ही 3 असामान्य लक्षणं कोरोना बाधितांमध्ये आढळू शकतात!
Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

जगभरात मागील 6 महिन्यांपासून कोरोना व्हायरसची दहशत पसरत आहे. अशामध्ये त्याचा फैलाव रोखण्यासाठी विविध देशात ठोस लशी आणि औषधं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे 31,263,651जणांना जगभरात कोरोनाची बाधा झाल्यानंतर दिवसागणिक कोविड 19 आजारात कोरोना व्हायरसचं बदलतं रूप आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती समोर येत आहे. संशोधकांना आता कोरोना रूग्णांमध्ये काही नवी लक्षणं आढळत आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्वसनाला त्रास, मळमळणे ही सामान्य लक्षणं आहेत. पण आता कोरोनाबाधितांना आणि पोस्ट कोविड देखील काही लक्षणं तुम्हांला कोरोना व्हायरसची बाधा झाला आहे याचे संकेत देतात. दरम्यान जगभरात अजूनही या लक्षणांवर संशोधन सुरू आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर प्रामुख्याने श्वसन नलिका आणि फुफ्फुसांमध्ये कोरोना व्हायरस हल्ला करतो. त्यामुळे सतत उचकी येणं हे एक कोरोनाचं लक्षण समजले जात आहे. अमेरिकेमध्ये या लक्षणावर अधिक अभ्यास केला जात आहे. Coronavirus केवळ फुफ्फुसांवर नव्हे तर मेंदू, हृद्य, किडनी सह शरीराच्या अन्य अवयवांवरही करतो घातक परिणाम; पहा COVID-19 चा रूग्णांच्या शरीरावर होणार्‍या गंभीर परिणामांबद्दल संशोधकांचा अभ्यास काय सांगतो

उचकी

The American Journal of Emergency Medicine मध्ये एक केस स्टडी सादर करण्यात आली आहे. यामध्ये 62 वर्षीय व्यक्तीला तापाची लक्षणं दिसू लागल्याने तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र या व्यक्तीला ताप येण्यापूर्वी चार दिवस सतत उचकीचा त्रास होता. कोरोना व्हायरसने फुफ्फुसांवर हल्ला केल्याने त्याच्यामध्ये हे लक्षण दिसत होते का? याचा अधिक अभ्यास सध्या अमेरिकेत सुरू आहे.

केस गळती

केस गळती हे देखील कोविड 19 चं एक लक्षण आहे. एका अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षामध्ये केस गळती ही कोरोनाची बाधा झाल्यानंतर पोस्ट कोविड पुढे अंदाजे 2 महिने आढळते. दरम्यान कोरोनाची बाधा झाल्यानंतर औषधोपचारांनी कोरोना बरा होत असला तरीही त्याचे नंतरही शरीरावर विविध अवयवांवर परिणाम होत असतात.

पर्पल टो रॅश

तरूणांमध्ये किंवा लहानग्यांमध्ये कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या पायाच्या बोटाला वेदना जाणवतात. याला एक्सपर्ट कोविड टो असे देखील म्हणतात.

रॅश

अनेक कोरोनाबाधितांमध्ये अंगावर रॅश आल्यचं लक्षण दिसलं आहे. यावर इटलीमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. तेथे त्वचारोग तज्ञांना अनेकांच्या अंगावर रॅश असल्याचं आढळलं. हे रेड रॅश कांजण्यासारखे किंवा रक्ताच्या गुठळ्या झाल्यासारख्या दिसतात. Mouth Rash COVID 19 Symptom: तोंडात रॅश हे कोविड 19 चं संभाव्य लक्षण, अधिक अभ्यासाची गरज; स्पेन संशोधकांचा दावा

दरम्यान कोरोना व्हायरसचं हे रूप हे सहज बदलणारं आहे. त्यामुळे जगाच्या विविध भागांमध्ये त्याच्यामुळे होणारा त्रास वेगळा आहे. भारतामध्ये जगातील कोरोनाबाधित देशांच्या यादीमध्ये दुसर्‍या स्थानी आहे. दिवसागणिक भारतामध्ये 90 हजारांच्या आसपास नव्या कोरोना रूग्णांची वाढ होत आहे.