गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये हा व्हायरस आणि लसीबाबत बराच अभ्यास समोर आला आहे. आता एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांपैकी एक तृतीयांश लोक ज्यांना सर्दी सारखी लक्षणे आहेत त्यांना प्रत्यक्षात COVID-19 ची लागण झाली असू शकते. किंग्ज कॉलेज लंडनमधील प्रोफेसर टिम स्पेक्टरच्या म्हणण्यानुसार, डेली मेलने नोंदवले आहे की नाक वाहणे किंवा घसा खवखवणे यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तीने त्याचा कोरोना विषाणू अहवाल नकारात्मक येईपर्यंत स्वतःला आयसोलेट केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, आयसोलेट करण्यासाठी किंवा कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी लोकांनी गंध किंवा चव कमी होण्याची, ताप येण्याची किंवा खोकला येण्याची वाट पाहू नये. सध्या, ते अंदाज लावत आहेत की, तीनपैकी एकाला झालेली सर्दी प्रत्यक्षात कोविडमुळे असू शकते. त्यांनी टाईम्स रेडिओला सांगितले की, आपण कोणाची चाचणी घेत आहोत याचा यूकेने जाणीव असली पाहिजे आणि सर्दीसारखी लक्षणे असलेल्या लोकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रोफेसर स्पेक्टर म्हणाले की, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी, सर्दीची लक्षणे दिसल्यास लोकांनी काही दिवस घरीच राहावे. आपण अशा लोकांना कार्यालयात न येण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. लोकांना अस्वस्थ वाटत असल्यास त्यांनी बाहेर जाने पूर्णतः टाळावे. स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि नंतर लक्षणे कमी होऊपर्यंत किंवा चाचणी नकारात्मक येईपर्यंत संपर्क टाळावा. (हेही वाचा: 'कोरोनापेक्षा अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक असेल पुढे येणारी महामारी'; Covid-19 लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचा दावा)
अहवालात म्हटले आहे की, शास्त्रज्ञांना आशा आहे की ओमायक्रॉनमुळे अधिक गंभीर लक्षणे उद्भवणार नाहीत आणि लसींद्वारे प्रदान केलेली टी-सेल प्रतिकारशक्ती गंभीर रोग टाळेल. टी-सेल्स हे एक प्रकारचे पांढरे रक्त पेशी आहेत जे कोविडला मारतात. परंतु, यास काही आठवडे लागू शकतात कारण ओमायक्रॉनसाठी लसींपासून किती चांगली प्रतिकारशक्ती विकसित होते हे पाहण्यासाठी चाचण्या सुरू आहेत.