
जगाने अनेक वर्षानंतर कोरोना विषाणूसारखी (Coronavirus) भयानक महामारी पहिली, ती जगली आणि आता त्याच्याशी दोन हात सुरु आहेत. परंतु ही गोष्ट इथेच थांबत नाही. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीच्या (Oxford-AstraZeneca Vaccine) निर्मात्यांपैकी एकाने चेतावणी दिली आहे की भविष्यातील महामारी सध्याच्या कोविड संकटापेक्षा जास्त प्राणघातक असू शकते. प्रोफेसर डेम सारा गिल्बर्ट (Dame Sarah Gilbert) यांनी 44 वे रिचर्ड डिम्बलबी व्याख्यान देताना सांगितले की, पुढे येणारी महामारी ही अधिक संसर्गजन्य असेल. तसेच अशा साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी अधिक पैशांची गरज आहे.
सारा यांनी चेतावणी दिली की कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन प्रकारावर ही लस कमी प्रभावी असू शकते. त्यांनी सांगितले की, या नवीन व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती मिळेपर्यंत लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या, ही शेवटची वेळ नसेल जेव्हा एखाद्या विषाणूमुळे आपले जीवन आणि आपली उपजीविका धोक्यात येईल. सत्य हे आहे की पुढील महामारी आणखी वाईट असू शकते. ती अधिक संसर्गजन्य किंवा अधिक प्राणघातक असू शकते. सध्याच्या परिस्थितीत आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येते. याचा अर्थ असा आहे की पुढील महामारीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे अद्याप कोणताही निधी नाही.
ओमायक्रॉन प्रकारावर बोलताना, प्रोफेसर सारा म्हणाल्या, ‘ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये उत्परिवर्तन होते. हे विषाणूचा प्रसार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी ओळखले जाते. परंतु लसीमुळे अँटीबॉडीज किंवा इतर प्रकारांचा संसर्ग झाल्यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्याची शक्यता कमी आहे. जोपर्यंत या व्हेरिएंटबाबत अधिक माहिती समोर येत नाही, तोपर्यंत आपण सतर्क राहिले पाहिजे. या नवीन प्रकाराचा प्रसार कमी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.’ (हेही वाचा: कोविड विषाणूचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'मुळे वाढल्या चिंता; जाणून घ्या या नव्या प्रकाराबद्दल सर्वकाही)
सारा यांनी असेही सांगितले की, संसर्ग आणि सौम्य आजारापासून संरक्षण कमी होणे म्हणजे गंभीर आजार आणि मृत्यूपासून संरक्षण कमी होईल असे नाही. महामारीच्या काळात लस आणि औषधांचे वितरण जलद करण्यासाठी मॉडेल बनण्याचे आवाहन सारा यांनी केले.