चीनमध्ये (China) कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) मागील महिनाभरापासून दहशत पसरली आहे. तर या व्हायरसची लागण झाल्याची 1975 प्रकरणे समोर आली असून मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा 56 वर पोहचला आहे. याबाबत राष्ट्रीय आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. चीनमध्ये मागील काही दिवसामध्ये एका अज्ञात विषाणूची लागण होऊन रूग्णांच्या संखेमध्ये वाढ होत असल्याने आता चीन सोबत आरोग्य संघटनेकडूनही 'कोरोना विषाणू' बाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
15 जानेवारी दिवशी चीन मधील आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वुहानमध्ये माणसांच्या संपर्कातून विषाणूंची लागण झाल्याची ठोस माहिती समोर आलेली नाही मात्र त्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पुढील दहा दिवसांतच म्हणजे 25 जानेवारीला चायनीज नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोकं देशभरात एकत्र जमले होते. त्यानंतर वुहान पाठोपाठ इतर शहरांतही रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.(Coronavirus याची चीन मध्ये झपाट्याने वाढ)
Tweet:
#चीन में #कोरोनावायरस के प्रकोप के कारण मरने वालों की संख्या 56 हो गई है, जबकि संक्रमित लोगों की संख्या 1,975 हो गई है। राष्ट्रीय स्वास्थ्य आयोग ने यह जानकारी दी।#CoronavirusOutbreak #Coronavirus #China
Photo: IANS (File) pic.twitter.com/9Urnl9uHhm
— IANS Tweets (@ians_india) January 26, 2020
कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.