Bubonic Plague: चीन च्या शहरामध्ये ब्यूबोनिक प्लेग चा संशयित व्यक्ती आढळल्यानंतर अलर्ट जारी;  जाणून घ्या या' ब्लॅक डेथ' आजारा विषयी!
Marmots (Photo Credits: Pixabay) Representational Image

चीन मध्ये कोरोना व्हायरसच्या थैमानानंतर आता  ब्यूबोनिक प्लेग (Bubonic Plague) चा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान स्थानिक मीडीया रिपोर्ट्स नुसार, Bubonic Plague उत्तर चीन मध्ये राविवार (5 जुलै) दिवशी एक  ब्यूबोनिक प्लेग संशयित व्यक्ती आढळल्याने आता लेव्हल III अलर्ट जारी करण्यात आला आहे. बयन्नुर मध्ये ही व्यक्ती आढळल्याने आता 2020 वर्षअखेरीपर्यंत अलर्ट जारी असेल. दरम्यान आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत स्वतःची काळजी घेण्याचंही आवाहन केले आहे.  ब्यूबोनिक प्लेग हा आजार जंगली उंदरांमध्ये आढळणार्‍या बॅक्टेरियांमधून पसरतो.

वेस्टर्न मंगोलिया भागामध्ये सध्या 2 रूग्णांवर ब्यूबानिक प्लेगचे उपचार सुरू आहेत. यामध्ये एक 27 वर्षीय तरूण आणि त्याचा 17 वर्षीय भाऊ आहे. Khovd province मध्ये त्यांचे लॅब टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती Xinhua news agency कडून 1 जुलैला देण्यात आली आहे. या भावांनी जंगली उंदरांचे मांस खाल्ल्याची माहिती आहे. दरम्यान त्यांच्या संपर्कातील 146 जणांना आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

Bubonic Plague म्हणजे Black Death का?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, Bubonic Plague हा आजार जंगली उंदरांवर फिरणार्‍या माशांच्या/ पिसवांच्या  माध्यमातून बॅक्टेरियाद्वारा पसरू शकतो. जर रूग्णांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर 24 तासांत त्याचा मृत्यू होऊ शकतो.

मागील वर्षी चीनमध्ये एका जोडप्याचं Bubonic Plague मुळे निधन झालं होतं. त्यांनी जंगली उंदराचं मांस खाल्ले होते. त्यामुळे आता या आजाराचं थैमान पसरण्यापूर्वीच नागरिकांना त्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्यूबोनिक प्लेग चे सन 2010 ते 2015 मध्ये सुमारे 3248 रूग्ण समोर आले होते. यामध्ये 584 जणांचा मृत्यू झाला होता. तर या काळात डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉन्गो, मॅदागास्कर, पेरू मध्ये सर्वाधिक रूग्ण होते. यापूर्वी 1970-80 मध्ये भारत, अमेरिका, रशिया, आफ्रिकेतही रूग्ण आढळले होते. 1347 मध्ये आलेल्या या आजाराच्या लाटीमध्ये त्याला ब्लॅक डेथ नाव देण्यात आले. त्यामध्ये युरोपात एक तृतीयांश जणांचा मृत्यू झाला होता.

चीन मध्ये सध्या वुहानचा कोरोना नियंत्रणात आल्यानंतर बीजिंगमध्ये रूग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. 13,14      जूनला बीजींगमध्ये कोरोना बाधितांनी पीक गाठला होता. त्यानंतर आता रूग्ण संख्या कमी होत आहे. दरम्यान  11 जून ते 4 जुलै दरम्यान या भागार कोरोनाचे 334 रूग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.