भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) आणि सीरम इंस्टटीट्यूटच्या (Serum Institute) कोविशिल्ड (Covishield) लसीला आत्पातकालीन वापरासाठी मंजूरी मिळाल्यानंतर काही दिवसांपूर्वी भारतात देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिम (Covid-19 Vaccination Drive) सुरु झाली. दरम्यान, भारत बायोटेकने फॅक्टशीट (Fact Sheet) रिलीज केली असून यात कोणी कोवॅक्सिन ही लस घेऊ नये यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याचबरोबर यात लसीचे फायदे देखील सांगण्यात आले आहेत. गर्भवती आणि स्तनदा मातांनी कोवॅक्सिन घेऊ नये. तसंच इतर औषधोपचार सुरु असलेल्या आणि रोग प्रतिकारकशक्ती कमकूवत असलेल्या लोकांनी देखील ही लस न घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
त्याचबरोबर अर्लजी, ताप किंवा ब्लिडिंग डिसॉर्डर्स असलेल्या व्यक्तींही कोवॅक्सिन लस घेणे टाळावे, असे सांगण्यात येत आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे दुष्परिणाम खालील प्रमाणे: (Bharat Biotech's Nasal Vaccine: भारत बायोटेकच्या Intranasal vaccine ला तज्ञ समितीची मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यासाठी मंजुरी)
# इंजेक्शन दिलेली बाजू दुखणे
# इंजेक्शन दिलेली बाजू सुजणे
# इंजेक्शन दिलेली बाजू लाल होणे
# इंजेक्शन दिलेल्या बाजूला खाज येणे
# हाताचा वरचा भाग दुखणे
# इंजेक्शन दिलेला हात अशक्त वाटणे
# बॉडी पेन
# डोकेदुखी
# ताप
# अशक्तपणा
# रॅश
# मळमळ
# उलटी
कोवॅक्सिनमुळे अर्लजी होण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ असल्याचे लस निर्माते आणि भारत बायोटेक यांनी जारी केलेल्या फॅक्टशीट म्हटले आहे.
अर्लजिक रिअॅक्शनची लक्षणे:
# श्वास घेण्यास त्रास होणे
# चेहरा आणि घशाला सूज येणे
# हृदयाची गती वाढणे
# संपूर्ण शरीरावर रॅश येणे
# चक्कर येणे आणि अशक्तपणा
FactSheet नुसार लस कोणी घेऊ नये:
# अॅलर्जीची हिस्ट्री असलेल्यांनी
# ताप असल्यास
# ब्लिडिंग डिसॉर्डर किंवा ब्लड थिनर असल्यास
# रोगप्रतिकारक शक्ती कमकूवत असल्यास किंवा रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करणारी औषधं घेत असल्यास
# गर्भवती स्त्रिया
# स्तनदा माता
# दुसरी कोविड-19 लस घेतली असल्यास
# इतर गंभीर आजार
या लसीची क्षमता तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्समधून योग्य प्रकारे समजतील. त्यामुळे कोविड-19 ची लस घेतली तरी देखील नियमांचे पालन करणे आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे.