
मे महिना सुरु झालाय आणि उन्हाच्या झळांनी संपुर्ण महाराष्ट्र पोळून निघतोय. प्रत्येक नागरिक उन्हाच्या (summer) झळांपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करत आहे. मग तो स्कार्फ बांधणं असो, गॉगल्स(goggles) असो किंवा फिकट रंगाचे कपडे घालणे असो. त्यात शीतपेय, बर्फाचा गोळा यांसारख्या गोष्टींचाही समावेश करता येईल. पण हे सर्व करत असताना उन्हापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा देखील तितकाच महत्त्वाचा पर्याय आणि योग्य उपाययोजना आहे. पण ह्या पाण्यासोबत गुणकारी असा सब्जा(sabja seeds) घेणे किती फायद्याचे ठरु शकेल हे ऐकलात, तर तुम्ही थक्कच व्हाल.
पाहा काय आहेत सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे:
सब्जाचे बी पाण्यासोबत अथवा सरबतासोबत घेतल्यास आपल्या शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात अनेकांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो. अशा वेळी सब्जाचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो. उन्हाळ्यात त्वचेवर (Skin) तसे केसांवरही विपरित परिणाम होत असतो. अशा वेळी सब्जाचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो. वजन कमी करण्यासाठी सब्जा अतिशय फायदेशीर आहे. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करतो आणि पोट, पचन क्रिया सुरळीत करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे अॅसिडीटी, जळजळ ह्या समस्यांमुळे होणारा त्रास कमी होतो. सब्जामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील टॉक्सिन दूर होतात.
Summer 2019: उन्हाळयात केसांचे आरोग्य जपा,अशी राखा केसांची निगा
सब्जाचे सेवन शरीरास हितवर्धक असले तरी, त्याचे अतिसेवन शरीरासाठी चांगले नाही. दिवसातून दोन वेळा दोन चमचे सब्जाचे बी तुम्ही नक्कीच सेवन करू शकता मात्र त्यापेक्षा अधिक सेवन करू नये.
(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय
सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला
घेणे आवश्यक आहे.)