Summer 2019:  उन्हाळयात केसांचे आरोग्य जपा,अशी राखा केसांची निगा
Hair care for summer (Photo Credits: Pixabay)

Summer Hair Care Tips : तापमानाचा पारा चाळीस अंशावर पोहचलाय अशात प्रत्येकालाच आपल्या आरोग्याची, त्वचेची काळजी वाटायला लागलीये . रणरणत्या उन्हात बाहेर जाताना  स्कार्फ, गॉगल अशा सर्व शक्य साधनांनी त्वचेला जपण्याचे प्रयत्न केले जातायत. मात्र हे करत असताना आपल्या केसांच्या आरोग्याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय का? उन्हाळयात  केसांची सर्वात जास्त काळजी घ्यायची गरज असते.वाढत्या गरमी मुळे घाम येऊन केस खराब होतात त्यांना वेळच्या वेळी धुऊन स्वच्छ न केल्यास ते रुक्ष होतात तसेच त्यात  गुंता होऊ शकतो

आज प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला केस गळणे, केसात कोंडा होणे, अवेळी टक्कल पडणे या समस्यांचा सामना करावा लागतो याचे मुख्य कारण म्हणजे केसांची योग्य निगा न राखणे. पण काळजी करू नका (त्याने केस आणखीन गळतात),यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्या लांब, मुलायम केसांची निगा कशी राखत आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी या काही कमी वेळ घेणाऱ्या आणि सोप्प्या टिप्स नक्की फॉलो करा... उन्हाळ्यात हवी नितळ, मुलायम, निरोगी त्वचा? घरच्या घरी करा हे उपाय

केसांना द्या स्टायलिश कट

अधिक उन्हाने केसातील ओलावा कमी होऊन केरेटीन मूल्य निघून जातात ज्यामुळे केसांना फाटे फुटण्याचे प्रमाण वाढते व ते रुक्ष होतात. हे टाळण्यासाठी ठराविक वेळेनंतर केसांना ट्रीम करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला केस लांब ठेवायचे असतील तर त्यांना बेसिक ट्रीम करून उन्हाळ्यासाठी तुम्ही थोडा हटके आणि स्टायलिश लूक  मिळवू शकता.

केसांना करा कव्हर

तुमच्या केसांना घरट्याचं रूप येऊ द्यायचं नसेल तर, घराच्या बाहेर पडताना तुमचं डोकं नेहमी स्कार्फ किंवा टोपीने कव्हर केलेलं असेल याची खबरदारी घ्या. उन्हाच्या किरणांनी केसांसोबतच स्कॅल्प वर देखील तणाव येतो, शिवाय आद्रता हरवून केस शुष्क होऊ शकतात. या स्कार्फचे हटके हेअरबॅन्ड बनवून तुमच्या सुमार स्टाईलमध्ये प्रयोग करू शकता.

ब्लो ड्राय करणं टाळा

उन्हाळयात अधिक घाम येत असल्याने केसांना योग्य शाम्पू आणि कंडिशनर ने वेळच्या वेळी धुवत जा. केस धुतल्यावर त्यांना कोरडे करण्यासाठी साधा टीशर्ट किंवा एखाद मुलायम कापड वापर, मात्र ब्लो ड्रायरला निदान उन्हाळ्यात तरी केसांपासून लांबच ठेवा .उन्हाळ्यासाठी विशेष असे सनस्क्रीन युक्त कंडिशनर्स बाजारात उपलब्ध आहेत याच्या वापराने तुमच्या स्कॅल्पची सुरक्षा करा.

खाण्याकडे लक्ष द्या

आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या केसांवर व त्वचेवर होत असतो त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यावर भर द्या. यासाठी भरपूर पाणी असणारी फळे जसे की,कलिंगड, संत्री खाऊ शकता, यासोबत शहाळ्याचे पाणी प्यायल्यास शरीराला नक्कीच फायदा होईल. मिनरल्स, व्हिटॅमिन्स व इतर पोषक तत्व असणारा आहार घ्या निदान काही दिवस तेलकट,तिखट अशा जंक फूडला टाटा केल्यास केसांचे स्वास्थ्य टिकून राहायला मदत होईल.

केस मोकळे ठेवू नका

उन्हाळ्यात केस मोकळे ठेवल्याने त्यांना उन्हाशी थेट संपर्क येतो, परिणामी केसांना हानी पोहचते. हे टाळण्यासाठी सोप्प्या हेअरस्टाईल्स करू शकता मात्र त्यासाठी हिट स्टायलिंग हा पर्याय निवडू नका.

  • उन्हाळ्यात पिकनिक ला गेल्यावर थंड स्विमिंग पुल मध्ये उड्या टाकायचा विचार करत असाल तर केसांना स्विमिंग कॅपने कव्हर करा.
  • केसांमध्ये कोणत्याही जखमा आढळल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

यंदाचा उन्हाळा केसांची, त्वचेची चिंता करत घालवण्यापेक्षा हे उपाय करून तुमच्या केसाला एक नवीन जीवन द्या, आणि मग  #Summer2019 पोस्टने सोशल मीडियावर कौतुक मिळवायला तयार व्हा...