Health Benefits Peepal Leaves: अगदी कोठेही सहजासहजी उगवणारे पिंपळाचे झाड सर्वांनाचं माहित असेल. परंतु, त्यांच्या पानाचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो, हे फार कमी लोकांना माहित असेल. पौराणिक कथांमध्ये पिंपळाच्या झाडाची पूजाही करण्यात आलेली आहे. आजही अनेक लोक पिंपळाच्या झाडाला पूजतात. पिंपळाचं झाड तुम्हाला दिवसातील 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करून देतं. याच्या पानांचा आपल्याला मोठा फायदा होतो. आज आपण या लेखामधून पिंपळाच्या पानाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत...
अनेक जुन्या पुराण्या आयुर्वेदीक ग्रंथामध्ये पिंपळाचं झाड आणि त्याच्या पानाबद्दल अनेक गुण सांगण्यात आले आहेत. पिंपळाच्या पानाचा रस चेहऱ्यावरील रंगामध्ये उजळपणा निर्णाण करतो. तसेच तुमच्या शरीरावर एखादी जखम बरी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी पिंपळाचे पान गुणकारी ठरते. पिंपळाच्या पानामुळे तुमचा सेक्शुअर स्टॅमिना वाढवण्यासही मदत होते. तसेच गर्भधारणेसाठीदेखील याचा मोठा फायदा होतो. पिंपळाच्या पानामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. पिंपळाचे मूळं, सालं, पानं आणि फळं या सर्वांचा तुमच्या आरोग्यासाठी उपयोग होतो. (हेही वाचा - Health Benefits Of Walnuts: अक्रोड खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या)
पिंपळाच्या पानाचे आरोग्यदायी फायदे -
तापेवर उत्तम उपाय -
तापावर औषध म्हणून पिंपळाचा मोठा फायदा होतो. यासाठी 10-20 पिंपळाची पानं घेऊन पाण्यात उकळवा. हा काढा गाळून पिल्याने ताप कमी होतो.
जुलाब -
तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असल्यास पिंपळाची पाने, धणे आणि खडीसाखर याचा समसमान भाग एकत्र करून घ्या. रोज सकाळ संध्याकाळ साधारण 3-4 ग्रॅम या मिश्रणाचे सेवन करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
पोटदुखी -
पोटदुखीवर पिंपळाच्या पानाचा काढा रामबाण उपाय ठरू शकतो. त्यासाठी पिंपळाची पानं घेऊन त्याचा काढा तयार करा. हा काढा पिऊन तुमचं पोट साफ होतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्यादेखील दूर होते. तसेच पिंपळाची पानं चाऊन खाल्ली तरीहीदेखील पोटदुखीच्या समस्यापासून आराम मिळतो.
क्षयरोग -
क्षयरोगावरील रामबाण उपाय म्हणजे पिंपळाचं मुळ. पिंपळाचे मुळ बारीक करून त्याचे रोज सेवन केल्यास, क्षयरोगाचा धोका कमी होतो.
रक्तविकार रोखण्यास मदत -
रक्तविकारांवरील आजारांवर पिंपळाच्या सालांचा काढा गुणकारी ठरतो. यासाठी पिंपळाच्या काढ्यामध्ये 5 ग्रॅम मध मिसळा. या मिश्रणाचे सेवन करा. असे केल्यास तुमची रक्तविकारापासून सुटका होईल.
खोकला -
पिंपळाची पानं दुधामध्ये उकळून त्यामध्ये साखर घाला. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी प्या. असे केल्यास तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळेल.
हृदयरोगावर गुणकारी -
हृदरोगापासून स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर पिंपळाची 15 ते 20 पानं घेऊन एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून गाळून घ्या. हा काढा दर 3 तासाने दिवसभर प्या. हा उपाय केल्याने तुमचे हृदयरोगापासून संरक्षण होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)