सावधान! जिमला जाण्यापूर्वी 'या' 5 गोष्टींचे सेवन करणं टाळा
Avoid this drinks Before Going To The Gym (PC- pixabay)

अनेकजण आपलं आरोग्य निरोगी राहावं यासाठी दररोज जिमला जातात. तसेच काहींना आपले वजन कमी किंवा वाढवायचं असतं. जीम जॉईन केल्यानंतर तुम्हाला योग्य आहार घेणं गरजेचं असतं. अन्यथा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच जिमला जाण्यापूर्वी तुम्ही काय खाता यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. अनेकजण जिमला जाण्यापूर्वी फ्रूट ज्यूस, चहा, कॉफी पितात.

मात्र, या गोष्टी पिल्याने आपल्या शरिरावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिमला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी पिणं किंवा खाणं आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. (हेही वाचा - लग्नसराईच्या काळात उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा, होईल फायदा!)

जिमला जाताना या गोष्टींचे सेवन करणं टाळा -

कार्बोनेटेड पेय -

ज्या पेयामध्ये कार्बोनेटेड पदार्थ जास्त असतात, अशी पेय पिणं टाळा. या ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रणाण जास्त असते. त्यामुळे हे पेयाचे सेवन करणे शरिरासाठी घातक ठरू शकते. तसेच हे पेय पिल्याने पोट फुगणं, अपचन आदी समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

हेही वाचा - Feet Care Tips: दिवसभर शूज घातल्यामुळे पायाला येणारा दुर्गंध टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या टीप्स

कॅफीन आणि निकोटीन पेय -

कॅफीन आणि निकोटीन शरिरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया कमी करते. त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच ऑक्सिजन घेण्यासाठी त्रास झाल्याने हृदयावर दबाव निर्माण होतो. यामुळे शरिराला त्रास होऊ शकतो.

अल्कोहोल -

अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऍनर्जी कमी होते. तसेच जिममध्ये व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातून घाम निघतो. व्यायाम करताना तुम्हाला भरपूर एनर्जीची आवश्यकता असते. त्यामुळे जिमला जाण्यापूर्वी अल्कोहोलचे सेवन टाळा.

स्पोर्ट्स ड्रिंक -

अनेकजण जिमला जाण्यापूर्वी स्पोर्टस ड्रिंक पितात. त्यामुळे आपल्या शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. तुम्ही या पेयाऐवजी घरात बनवलेले ज्यूस घेऊ शकता.

फ्रूट ज्यूस -

जिमला जाण्यापूर्वी फळं खाणं फायदेशीर असतं. परंतु, यादरम्यान बाजारात मिळणारे फळांचे ज्यूस घेणं घातक ठरू शकतं. या ज्यूसमध्ये साखर आणि इतर द्रव्य असतात. जे शरीरासाठी अत्यंत घातक असतात. त्यामुळे जिमला जाण्यापूर्वी फ्रूट ड्रिंक्स पिणं टाळा.

जिमला जाण्यापूर्वी वरील गोष्टींचे सेवन करणं नक्की टाळा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)