प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सध्या लग्नसराईचे दिवस सर्वत्र सुरु आहेत. त्यामुळे लग्नासाठी कपड्यांपासून ते जेवणापर्यंतच्या अन्य छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिले जात आहे. मात्र या सर्वांमध्ये तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष तर होत नाही ना याकडे सुद्धा लक्ष द्या. कारण लग्नसराईच्या दिवसांमध्ये बहुतांश वेळा बाहेरील जेवण ऑर्डर केले जाते. या जेवणात तेलकट पदार्थ, मिठाई आणि कोल्ड ड्रिंक्स तुमच्या आरोग्यावर परिणाम करत तुम्हाला आजाराचे बळी पाडू शकतात. त्यामुळे वेळीच योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणे या सर्व धावपळीमध्ये जरुरीचे आहे.

तसेच लग्नासाठी खरेदी करण्यात येणारे कपडे सुद्धा आपण सैल घेतो. कारण लग्नावेळी ऑर्डर केलेल्या जेवणात भरपूर प्रमाणात सोडा वापरला जात असल्याने पोट पुढे आल्याचे दिसून येते. त्यामुळे पोट फुगण्यापासून किंवा अॅसिडिटीच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी ब्रोकोली, काळे चणे, फ्लॉवर किंवा कोबी सारख्या भाज्यांपासून दूर रहा. तर लग्नसराईच्या वेळेत आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे पदार्थ जरुर खा.(Winter Health Tips: हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होतील 'हे' फायदे) 

- दुपारी जेवणानंतर लगेच हिंग किंवा काळे मीठ वापरुन छास प्या. कारण ते प्रोबायोटिक्स आणि विटाबीन बी12 चे उत्तम स्रोत समजले जाते. हिंक आणि काळे मीठ पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतो.

-तसेच च्यवनप्राशन खाल्ल्याने तुमची पाचनक्रिया सुरळीत सुरु राहण्यास मदत होते. त्याचसोबत तुमची त्वचा सॉफ्ट आणि कोमल राहते.

-गुळ, तूप आणि सुखे आले टाकून बनवलेले लाडू आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात. कारण हे खाल्ल्याने पोटात गोळा येण्याचा प्रकार दूर होतो.

त्यामुळे लग्नसराईच्या काळात तुम्ही अतितेलकट पदार्थ खाण्यापूर्वी फळहार करा. त्यामुळे तुम्हाला याचा फायदा होण्यासोबत तेलकट पदार्थ कमी खाल्ले जातील. त्याचसोबत तुमचे शरीर हायड्रेड राहण्यास ही मदत होईल. त्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन-तीन लीटर पाणी पिणे महत्वाचे आहे. एवढेच नाही तर बदाम, अक्रोड, पिस्ता यांसारख्या सुकामेव्याचे सुद्धा सेवन केल्यास आरोग्याला भरपूर प्रमाणात खनिज मिळतील आणि उर्जा निर्माण होण्यास ही मदत होईल.