
आज आपण कलौंजी चे महत्व जाणून घेणार आहोत आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात ज्यात औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक म्हणजे कलौंजी. कलौंजी हे नाइजेला या औषधी वनस्पती चे बियाणे असतात.कलौंजी सेवन केल्यास,शरीराला लोह, सोडियम, पोटॅशियम, फायबर आणि खनिजे मिळतात. कलौंजीचा उपयोग भाज्या, कोशिंबीर, पुलाव आणि इतर अनेक पदार्थांमध्ये वापरुन नित्य सेवन केल्यास अनेक फायदे होतात. भारतात लोणचे बनवण्यासाठी कलौंजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
कलौंजीचे महत्व
केस गळतीवर सर्वात उत्तम आहे कलौंजीचे तेल. केसगळती रोखायची असल्यास कलौंजीच्या तेलाचा वापर केल्यास फायदा होतो.
चहामध्ये कलौंजीचे तेल टाकून प्यायल्यास मधुमेह रुग्णांची शुगर नियंत्रणात राहते.
कलौंजी चे बियांचे चूर्ण नारळ तेलामध्ये मिसळून त्वचेवर मालिश केल्यास त्वचेचे विकार दूर होतात.
कलोंजीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे कर्करोगासारख्या रोगांच्या विकासास कारणीभूत ठरणारे हानिकारक मुक्त रॅडिकल्स मारण्यास मदत करते.
कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करण्यासाठी कलोंजी प्रभावी आहे.
कलोंजी यकृताला दुखापत आणि नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.
कलौंजीचे दुष्परिणाम
गर्भवती महिलांनी व स्तनपान देण्याऱ्या मातेने कलौंजीचे सेवन टाळले पाहिजे
मासिक पाळीचा त्रास असल्यास कलौंजीचे सेवन करून नये.
ज्यांना पित्ताचा त्रास होतो आणि अति उष्णता सहन होत नाही त्यांनी कलौंजीचे सेवन करून नये.
अती प्रमाणात कलौंजी घेतल्यास चक्कर येण्याचा धोका असतो.
कलौंजी मधे बायोएक्टिव कंपाउंड असतात. कलौंजिचा अति वापर हा आपल्या शरीरात बायोएक्टिव कंपाउंडचे प्रमाण वाढवतो. त्यामुळे आपल्या शरीरातील साखरेच प्रमाण अनियंत्रित होते व त्यामुळे रक्ताशी निघडीत बरीच समस्या निर्माण होऊ शकतात.