Ministry of Ayush: आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी ज्या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत त्याचे नागरिकांकडून पालन करण्यात येत आहे. आयुर्वेदिक काढा आणि औषधे महारोगाच्या याच काळात किती उपयुक्त आहे या संबंधित आयुर्वेद विशेषत्ज्ञ कौशिक दास महापात्रा यांनी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. आयुष मंत्रालयाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये काढ्याचा वापर करावा असा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु काढा बनवण्यासाठी योग्य पद्धत काय असावी? या संबंधित प्रसार भारती यांच्यासोबत बातचीत करताना कौशिक महापात्रा यांनी असे म्हटले की, कोविड19 पासून बचाव करण्यासाठी सुंठ, दालचिनी, मनुका, काळीमिरी आणि तुळस यांच्यापासून काढा बनवण्यात आला आहे.
कौशिक यांनी पुढे असे म्हटले आहे की, आपल्याला या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात वापरुन काढा तयार करता येणार आहे. जे रुग्ण औषधांचे हेवी डोज सहन करु शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही काढा उकळवल्यानंतर तो अर्धा ठेवण्यास सांगतात. तसेच ज्या रुग्णांमध्ये औषधांचे हेवी डोज सहन करण्याची शक्ती आहे त्यांच्यासाठी काढ्याला अधिक घट्ट (Concentrated) बनवण्यासाठी 1/4 ठेवण्यासाठी सांगितले जाते. या काढ्यापासून होणारा फायदा हा संपूर्ण शरिराचे संरक्षण करण्यास मदत करतो.(Health Tips: शरीरातील Metabolism संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी)
जर एखादा व्यक्ती या काढ्याचे सेवन करत असल्यास त्याला यासाठी लागणाऱ्या गोष्टींचे प्रमाण किती असावे हे लक्षात घ्यावे याबाबत सुद्धा कौशिक यांनी सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, या काढ्याचे सेवन जेवणापूर्वी करावे. तसेच काढ्याचे सेवन 20ML चे चार चमचे सकाळी आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर करु शकता. काढा पिण्यासाठी ही सर्वाधिक उपयुक्त वेळ आहे.(धक्कादायक! टक्कल आणि कोविड19 यांच्यामध्ये गहिरे नाते, टकलू व्यक्तींना Coronavirus चा सर्वाधिक धोका असल्याचे रिसर्च मधून खुलासा)
तसेच लहान मुले या काढ्याचे सेवन करण्यास नाकारत असल्यास त्यामध्ये मुलेठी आणि अश्वगंधा याचा वापर केला जाऊ शकतो. कारण या दोन्ही गोष्टी गोड असल्याने लहान मुले ते सहज खाऊ शकतात. त्याचसोबत जेष्ठ नागरिकांसाठी सुद्धा हा काढा फार उपयुक्त ठरु शकतो. तसेच हळद टाकलेले दूध प्यावे कारण ते शरीर आणि गळ्यासाठी फायदेशीर असते. काढ्याचे सुद्धा तुम्ही सेवन करु शकता. च्यवनप्राश ही सेवन करु शकता.