Coronavirus And Baldness: जवळजवळ संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने आपले थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनावर नियत्रंण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असले तरीही त्यासाठी औषध मिळत नाही आहे. जगभरातील वैज्ञानिक, संशोधनकर्ते कोविड19 ची संरचना आणि नवी लक्षणांसह त्यावरील औषधावर संशोधन करत आहेत. आता पर्यंत कोरोना व्हायरस संबंधित अभ्यास आणि काही सर्वे सुद्धा करण्यात आले आहेत. या दरम्यान असे समोर आले की, रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती, गंभीर आजार आणि जेष्ठ नागरिकांना कोरोनाचे संक्रमण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्याचसोबत एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, संक्रमणाचा धोका महिलांपेक्षा पुरुष मंडळींमध्ये अधिक आहे. यानंतर आता एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यास असे म्हटले आहे की, टक्कल आणि कोविड19 यांचे गहिरे नाते आहे. त्यांचा असा दावा आहे की, टक्कल पडलेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका सामान्य व्यक्तीपेक्षा सर्वाधिक आहे. शोधकर्ता कार्लोस वैम्बियर यांचे असे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस आणि त्याची स्थिती गंभीर होण्याचा टक्कल पडण्याशी संबंध आहे. रिपोर्टनुसार कोरोना व्हायरस आणि टक्कल यांचा संबंध जाणून घेण्यासाठी दोन अभ्यास करण्यात आल्यानंतर त्याचे परिणाम सारखेच आले आहेत.(Cannabis & Coronavirus: कोरोना व्हायरस रोखण्यासाठी गांजाचा उपयोग केला जाऊ शकतो: अभ्यासातून खुलासा)
पहिला अभ्यास स्पेन येथील 41 कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यात आला. त्यामध्ये 71 टक्के रुग्णांना टक्कल पडलेले होते. दुसरा अभ्यास 122 पुरुषांवर केला असता त्यामध्ये अमेरिकन अॅकेडमी ऑफ डर्मेटोलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. दुसऱ्या अभ्यासात सहभागी असलेल्यांमध्ये 79 टक्के कोरोनाबाधित रुग्ण टकले असल्याचे समोर आले.(Kawasaki Syndrome: कोरोना व्हायरसनंतर भारतामध्ये उद्भवू शकतो कावासाकी सिंड्रोमचा धोका; चेन्नईमध्ये 8 वर्षाच्या मुलामध्ये आढळली लक्षणे)
शोधकर्ता यांच्यानुसार, पुरुषांच्या शरीरात असलेले अॅन्ड्रोजन हार्मोन टक्कल पडण्याचे कारण ठरते. हेच हार्मोन कोरोना व्हायसच्या संक्रमणाची शक्यता अधिक वाढवतात. अभ्यासानुसार, हे हार्मोन रुग्णांवरील औषधांचा प्रभाव सुद्धा कमी करतात. त्यामुळे संक्रमित रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी अधिक वेळ लागतो. अॅन्ड्रोजन हार्मोन कोविड19 च्या कोशिका संक्रमित करण्याच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतो. मात्र काही शोधकर्त्यांचे असे मानणे आहे की, टक्कल पडणे आणि कोरोना व्हायरस मधील संबंध समजण्यासाठी आता आणि अभ्यासाची आवश्यकता आहे.