
अशी अनेक माणसे आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी कितीही खाल्ले तरी अंगाला लागत नाही. अशा वेळी आपण त्यांना तुझे मेटाबॉलिजम (Metabolism) चांगले असेल असे सांगतो. मात्र हे मेटाबॉलिजम म्हणजे नेमक काय तर तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया. जर तुमची चयापचय क्रिया चांगली असेल तर तुमचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहते. मात्र त्यासाठी काही ठराविक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. जसे की तुमच्या खाण्याच्या, झोपण्याच्या वेळा या नियमित असल्आ पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या आहारही योग्य असला पाहिजे.
हे मेटाबॉलिजम संतुलित राखण्यासाठी नेमकं काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हे चयापचय क्रिया संतुलित राहण्यासाठी काय करता येईल याची माहिती देणार आहोत. Summer Eye Care Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची निगा राखण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
1. रोज सकाळी नियमितपणे नाश्ता करावा. न केल्यास मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावते.
2. झोपण्याच्या दोन तास आधी अवश्य जेवण करावे.
3. रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर 5-10 मिनिटे चालावे.
4. ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.
5. वजन उचलण्याचा व्यायाम करून स्नायू पिळदार करावेत.
या गोष्टीमुळे तुमचा आहार संतुलित राहतो. आणि तुमची चयापचय क्रियाही चांगली राहते. जर मेटाबॉलिझमची प्रक्रिया मंदावली तर शरीरातील ऊर्जा पातळी आपोआप कमी होते. त्यामुळे वर सांगितलेल्या गोष्टींचे नियमित पालन करावे.
Health Tips: कारले खाण्याचे 'हे' फायदे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही - Watch Video
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)