उन्हाळ्यात (Summer) तापमान वाढल्यामुळे खूप उकाडा जाणवतो. अशा वेळी आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. या उन्हात स्वत:चा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली आहे. मात्र रणरणत्या उन्हाचा सर्वात जास्त त्रास शरीराच्या ज्या अवयवाला जाणवतो ते म्हणजे आपले 'डोळे' (Eyes). हा पंचेंद्रियांपपैकी सर्वात नाजूक अवयव आहे. जर तो निकामी झाला तर संपूर्ण जग तुमच्यासाठी अंधारमय होईल. उन्हात सूर्यकिरणे सरळ डोळ्यांवर पडतात अशा वेळी अनेकदा आपल्या डोळ्यांपुढे अंधारी येते, गरगरल्या सारखे वाटते. अशा वेळी काय करावे काही सूचत नाही. अशावेळी डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे फार आवश्यक आहे.
उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी केवळ सनग्लासेस घालणे महत्वाचे त्याची नीट काळजी घेणे देखील आवश्यक आहे. अशा वेळी त्वरित आणि घरगुती उपायांनी तुम्ही डोळ्यांना उन्हापासून दूर ठेवू शकतात.
उन्हाळ्यात डोळ्याची काळजी कशी घ्याल?
1. डोळ्यांना होणारा उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून 4-5 वेळा थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे. Health Tips: शरीरात हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आहारात असावा 'या' अन्नपदार्थांचा समावेश
2. तेलकट, तिखट पदार्थ खाण्यापेत्रा उन्हाळ्यात कोकम, लिंबू, वाळा, गुलकंद चा सरबत करुन प्यावे.
3. डोळ्यांवर काकडीचा काप ठेवल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांसमोर आलेली अंधारी कमी होते. Summer Health Tips: उन्हाळ्यात बनवा पुदिन्यापासून बनवलेले 'हे' पेय आणि सन स्ट्रोक पासून करा स्वत:चा बचाव
4. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. यामुळे डोळ्यांना उन्हाचा त्रास कमी होतो.
5. हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट यांचा रस करून प्यायल्याने डोळ्यांना होणारा त्रास कमी होतो.
उन्हाळ्यात डोळे वारंवार हाताने चोळू नये. यामुळे हाताला असलेले धूळीचे कण डोळ्यात जाण्याची शक्यात असते. उन्हाळ्यात पंचेंद्रियांपैकी सर्वात नाजूक अवयव असलेल्या डोळ्यांची निगा चांगली राखली पाहिजे. अन्यथा डोळ्यांसंबंधीचे अनेक आजार होऊ शकतात.