Chicken | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

चिकन (Chicken) आणि अंडी (Egg) खाणाऱ्या खवय्यांच्या खिशावराचा भार काहीसा अधिक वाढणार आहे. मांसाहारामध्ये त्यातल्या त्यात थोडे स्वस्त म्हणून चिकन आणि अंड्यांकडे पाहिले जाते. परंतू, श्रावण (Sravana) संपला आणि चिकन, अंडी दर (Chicken, Egg Price) चांगलेच कडाडले. त्यामुळे बॉयलर कोंबडी (Boiler Chicken) आणि गावठी कोंबडी (Village Chicken) यांच्या दरात प्रति किलो 10 रुपये तर अंडी दर प्रति नग 1 रुपया म्हणजेच प्रति डझन 12 रुपये इतकी वाढ झाली आहे. श्रावण महिन्यात अंडी, चिकन ग्राहकांमध्ये वाढ होते. त्याचा फायदा घेऊन विक्रेते दर वाढवतात. दुसऱ्या बाजूला सांगितले जात आहे की, आवश्यक प्रमाणात चिकन आणि अड्यांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे दर महागले आहेत.

मांसाहारामध्ये सर्वसाधारणपणे मासे, मटन याच्या तुलनेत चिकन आणि अंडी स्वस्त असतात. दरमाध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे आपल्या खिशाचा विचार करुन मांसाहार करणारे बहुतांश लोक अंडी किंवा चिकनला प्राधान्य देतात. गणोशत्सव काळात बॉयलर कोंबडी प्रति किलो 140 रुपये, गावठी कोंबडी प्रति किलो 230 रुपये दराने विकली जात होती. तर अंडी प्रति नग 5 रुपये म्हणजे 60 रुपये प्रति डझन दराने विकली जात होती. आता मात्र, हे दर कोंबडी प्रति किलो 10 रुपये तर अंडे प्रति नग 5 रुपयांनी महागले आहे. (हेही वाचा, Bird Flu FAQs: अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का? Avian Influenza धोका माणसाला किती? जाणून घ्या बर्ड फ्लू संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे)

कोरोना काळात चिकन व्यवसाय भलताच अडचणीत आला होता. कोंबडीचे मांस खाण्याबाबत अनेक गैरसमज होते. त्यामुळे चिकन आणि अंड्यांचे दर प्रचंड घसरले होते. शिवाय अनेक पोल्ट्री व्यवसायिकांनी मालाचा उठावच झाला नाही. त्यामुळे आपल्याकडील कोंबड्या अक्षरश: खड्डे खणून त्यात दफन केल्या होत्या. त्याचा परिणाम सहाजिकच चिकन व्यवसायावर झाला. मालाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे चिकन व्यवसायिक आणि पोल्ट्री व्यवसायीक दोन्ही अडचणीत आले. पुढे परिस्थितीत हळूहळू बदलत गेली. चिकनबाबतचे गैसरमज दूर झाले. चिकन व्यवसाय पूर्ववत होऊ लागला. त्याचाच परिणाम दरवाढीत पाहायला मिळतो आहे.