Monsoon Recipes: पावसाळ्याचे महिने सुरु आहेत म्हणजे अलीकडे अधून मधून वारंवार भजी, वडे, असे पदार्थ होत असतील ना, अर्थात या मध्ये लागणाऱ्या तेलामुळे तुम्हालाही खाताना थोडंफार वाईट वाटून जात असेल. पण आता काळजी करण्याची किंबहुना वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही. कारण आज आपण बेसन व त्यापासून बनणाऱ्या पदार्थांशी संबंधित अनेक गैरसमज दूर करतील अशी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला ठाऊक आहे का की ज्या बेसनाच्या पदार्थांमुळे वजन वाढेल अशी चिंता आपण करतोय खरंतर हेच पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. विशेषतः बेसनाचा पोळा (Besan Chilla). कधी भाजी बनवायला कंटाळा आला तर पटकन तोंडी लावण्यापुरता बनणारा हा पदार्थ वजन घटवण्यापासून ते मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टीत मदत करतो, या पदार्थाचे फायदे आणि झटपट रेसिपी या लेखातून पाहुयात.
(हे ही वाचा - वजन कमी करण्यासाठी बेसनाची कढी उत्तम उपाय, जाणून घ्या फायदे)
बेसन च्या पोळ्याचे फायदे
बेसनाचे पीठ हे चरबी वितळण्यासाठे देखूपच फायद्याचे असते. एक बेसनाचा पोळा सुद्धा पोटभरीचा ठरतो त्यामुळे अति खाण्याचा प्रश्नच येत नाही परिणामी उगाच वाढणारी चरबी ही समस्यां सुद्धा दूर होते. एनर्जीचा स्रोत म्हणून सुद्धा बेसन ओळखले जाते.
बेसन मध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो जो आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासत राहण्यास मदत करतो. मधुमेह हा आजार असल्यास बेसनाचा पोळा अगदी उत्तम.
कोलेस्ट्रॉल ही आणखी एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतात. बेसनमध्ये विद्रव्य फायबर आहे जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
आपल्यापैकी ज्यांना ग्लूटेनपासून अॅलर्जी आहे त्यांच्यासाठी बेसन सर्वोत्कृष्ट ग्लूटेन फ्री-पीठ ठरेल.
बेसन पोळ्याची रेसिपी
दरम्यान, वर दिलेली रेसिपी ट्राय करताना तुम्ही शक्य तितक्या कमी तेलाचा वापर केलात तर उत्तम, अन्यथा ऑलिव्ह ऑईलचा सुद्धा विचार करू शकता. शक्यतो सकाळच्या नाश्त्याला हा पदार्थ जास्त फायद्याचा असेल कारण त्यामुळे कॅलरीज बर्न करण्यासाठी अख्खा दिवस मिळतो.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)