 
                                                                 Maghi Ganesh Jayanti 2025: माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2025) चा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारी भागात साजरा केला जातो. तर भारतातील इतर प्रदेशांमध्ये हा सण भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला साजरा केला जातो. माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीला माघ शुक्ल चतुर्थी, वरद चतुर्थी (Varada Chaturthi 2025) आणि तिलकुंड चतुर्थी (Tilakund Chaturthi 2025) इत्यादी नावांनी ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जो भक्त या दिवशी खऱ्या मनाने उपवास करतो आणि विधीनुसार गणपतीची पूजा करतो, त्याच्या आयुष्यात कधीही सुख आणि समृद्धीची कमतरता राहत नाही.
गणेश जयंतीची शुभ मुहूर्त -
यंदा माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारी रोजी म्हणजेच शनिवारी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी गणेश जयंती पूजा मुहूर्त सकाळी 11:38 ते दुपारी 01:40 पर्यंत असणार आहे. तुम्ही या वेळेत गणरायाची पूजा करू शकता. (हेही वाचा - Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: माघी गणेश जयंतीनिमित्त पाठवता येतील अशा आकर्षक आमंत्रणपत्रिका, येथे पाहा)
- चंद्रदर्शनाची वेळ सकाळी 09:02 ते रात्री 09:07 पर्यंत आहे.
- चतुर्थी तिथी 1 फेब्रुवारी 2025 रोजी 11:38 वाजता सुरू होईल.
- चतुर्थी तिथी 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 09:14 वाजता संपेल.
गणेश जयंतीच्या दिवशी 'अशी' करा गणरायाची पूजा -
- गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला.
- यानंतर, गणपतीच्या पूजेची तयारी करा.
- यासाठी, एका पाटावर स्वच्छ कापड पसरवा आणि त्यावर गणेशाची मूर्ती ठेवा आणि पूजा सुरू करा.
- पूजेचे वेळी, प्रथम उपवास करण्याचे व्रत घ्या.
- त्यानंतर विधीनुसार पूजा केल्यानंतर गणपतीची आरती करा.
- या दिवशी तुम्ही उपवास करू शकता. तसेच फळे खाऊ शकतात.
- संध्याकाळी विधीनुसार गणपतीची पूजा करा.
- रात्री चंद्र देवाला अर्घ्य अर्पण करा.
- चंद्राची पूजा केल्यानंतर, तुमचा उपवास संपवा.
गणेश जयंती मंत्र -
माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही 'ॐ गं गणपतये नमः' या मंत्राचा जाप करू शकता. यामुळे तुमच्या मनाना शांती लाभेल. 'ॐ गं गणपतये नमः' हा गणरायाचा आवडता मंत्र आहे. याशिवाय, तुम्ही ।। श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा॥ या मंत्राचा देखील जप करू शकता.
माघी गणेश जयंतीचे महत्त्व -
गणेश जयंतीबद्दल अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने चांगले फळ मिळते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. माघी गणेश जयंतीच्या दिवशी दर्शनासाठी गणेश मंदिरांत भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी होते.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
