Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: माघी गणेश जयंतीनिमित्त पाठवता येतील अशा आकर्षक आमंत्रणपत्रिका, येथे पाहा

गणेश जयंती हा तो दिवस आहे ज्या दिवशी गणपती पहिल्यांदा पृथ्वीवर पोहोचले. हिंदू दिनदर्शिकेनुसार तिथी म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी, म्हणजेच माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी. म्हणून या दिवसाला माघी श्री गणेश जयंती असेही म्हणतात. या दिवशी लोक आपल्या मित्र-मैत्रिणींना गणपतीच्या दर्शनासाठी आपल्या घरी आमंत्रित करतात. आपण खालील संदेश आणि चित्रांद्वारे आपल्या नातेवाईकांना श्री गणेशाच्या दर्शनासाठी आमंत्रित करू शकता.

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: माघी गणेश जयंतीनिमित्त पाठवता येतील अशा आकर्षक आमंत्रणपत्रिका, येथे पाहा
Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्र आणि कोकणात माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी गणपती यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.  हा दिवस माघ महिन्यातील माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस होता. त्यामुळे दरवर्षी हा दिवस माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. गणेशभक्त माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. बाप्पाच्या भक्तांसाठी गणेश जयंती खूप खास असते. या दिवशी ते आपापल्या घरी गणपतीची पूजा करतात आणि मोठ्या भक्तीभावाने प्रार्थना करतात. याशिवाय काही गणेशभक्त या दिवशी एक दिवसाचे उपवासही करतात. गणेश जयंती हा तो दिवस आहे ज्या दिवशी गणपती पहिल्यांदा पृथ्वीवर पोहोचले. हिंदू दिनदर्शिकेनुसार तिथी म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी, म्हणजेच माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी. म्हणून या दिवसाला माघी श्री गणेश जयंती असेही म्हणतात. या दिवशी लोक आपल्या मित्र-मैत्रिणींना गणपतीच्या दर्शनासाठी आपल्या घरी आमंत्रित करतात. आपण खालील संदेश आणि चित्रांद्वारे आपल्या नातेवाईकांना श्री गणेशाच्या दर्शनासाठी आमंत्रित करू शकता.

माघी गणेश जयंती निमित्त पाठवता येतील अशा खास आमंत्रण पत्रिका:

श्री गणेशाय नम:

आमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींचं आगमन होणार आहे तरीही आपण 1 फेब्रुवारी 2025 दिवशी सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी घरी यावं ही विनंती.

वेळ-

आरतीची वेळ :

विनित -

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi
Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi

श्री गणेशाय नम:

आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर हजेरी लावावी.

आपले लाडके,

पत्ता:

वेळ:

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi
Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi

llश्री गणेशाय नम:ll

आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे.

या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत

आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.

पत्ता:

वेळ:

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi
Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi

ॐ श्री गणेशाय नम:॥

माघी गणेश उत्सवामध्ये यंदाही आमच्या घरी दरवर्षी प्रमाणे गणरायाचं आगमन होणार आहे.

तरी बाप्पाच्या दर्शनासाठी घरी येऊन तीर्थ प्रसादाचा आस्वाद घ्यावा.

पत्ता:

वेळ :

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi
Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi

ॐ श्री गणेशाय नम:॥

आमच्या घरी माघी गणेश जयंतीनिमित्त गणरायाचं आगमन होणार आहे.

या निमित्त होणार्‍या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी

आपणास श्री.................................आणि सौ .................................... कडून आग्रहाचे निमंत्रण!

पत्ता -

तारीख -

वेळ -

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi
Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi

 हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा गणेश जयंती १ फेब्रुवारी ला आहे. याला गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र श्री गणेशाची पूजा केली जाते.

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 04:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).