World Water Day 2019 Theme: 22 मार्च हा दिवस दरवर्षी 'जागतिक जल दिन' (World Water Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस ‘Leaving no one behind’ या थीमवर साजरा केला जाणार आहे. म्हणजेच पाण्यापासून कुणालाच वंचित राहावं लागू नये याकरिता प्रयत्न केले जाणार आहे. पाणी प्रश्न हा जगभरात चिंतेचा विषय बनत चालला आहे. काही ठिकाणी जात, धर्म, लिंग यावरून लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं जातं. तर कुठे नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांना पिण्यासाठीदेखील पाणी उपलब्ध नाही. जाती स्तरावर पाणी प्रश्नावर गांभीर्याने विचार केला जात आहे.
2030 पर्यंत शाश्वत विकासच्या (Sustainable Development) माध्यमातून प्रत्येकाला पाणी मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या Sustainable Development Goal 6 च्या लक्ष्यानुसार, 2030 पर्यंत शाश्वत विकास आणि नियोजनाद्वारा प्रत्येकाला मिळवून दिले जाईल. आज शेती पासून, घर, कामाचं ठिकाण, शाळा येथे पिण्याचं सुरक्षित पाणी उपलब्ध नाही. काही ठिकाणी विविध स्तरावर यावरून भेदभाव केला जात आहे. 2010 साली संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहिती नुसार मानवी हक्कानुसार, प्रत्येकाला सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळणं हे गरजेचं आहे. असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे.
महाराष्ट्रामध्ये पाणी प्रश्नी काम करणाऱ्या संघटना
महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची स्थिती बिकट असल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करतात. दुष्काळ असल्याने अनेक ग्रामीण आणि शहरी भागातही पिण्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध नाही. त्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. अभिनेता आमिर खान त्याच्या टीम सोबत 'पाणी फाऊंडेशन' काम करते. तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे ' नाम' फाउंडेशनच्या खाली काम करतात. महाराष्ट्र सरकार जलयुक्त शिवार योजना राबवत आहे.