'जागतिक मुद्रण दिन 2020' निमित्त जाणून घ्या 'मुद्रण' कलेचा इतिहास
Johannes Gutenberg (PC -Wikipedia)

प्रत्येक वर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मुद्रण दिन' (World Printing Day 2020) म्हणून जगभर साजरा केला जातो. मुद्रणकलेचा जनक योहानेस गुटेनबर्ग (Johannes Gutenberg)

यांचा जन्मदिन 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो. मुद्रण कलेच्या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत. आज आपण सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचा उत्तम नमुना आहे.

आज जागतिक मुद्रण दिनाचे औचित्य साधून आपण मुद्रण कलेचा इतिहास जाणून घेऊयात. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये मुद्रण पद्धतीचा शोध लागला. त्यानंतर या क्षेत्रात प्रचंड गतीने प्रगती झाली. त्याकाळी मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा यांचा समावेश होता. बौद्ध धर्मातील काही विचार, मजकूर संगमरवरी दगडी खांबावर कोरून ठेवले जात असतं. (हेही वाचा - गरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं; अन्यथा होईल मोठं नुकसान)

मुद्रण कलेची कल्पना सुचली कशी?

इसवी सनानंतरच्या दुसर्‍या शतकात चीनी लोक कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असतं. यावरून चीनी लोकांना मुद्रणप्रतिमेद्वारा प्रिंटिंगचे तंत्र सापडले. त्यानंतर सहाव्या शतकानंतर संगमरवरी दगडाची जागा लाकडाने घेतली. कारण दगडावर अक्षर कोरण्यापेक्षा लाकडावर कोरणं जास्त सोपं आहे. इ. स.1041-48 या कालखंडात बी शंग नावाच्या चिनी व्यक्तीने मुद्रणासाठी चल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येणाऱ्या खिळ्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला.

इ. स 1434 ते 1439 हा काळ मुद्रण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा काळ होता. या काळात जर्मनीतील योहान गूटेनबर्ग यांनी 'धात्वलेखी मुद्रण' नावाचा प्रकार शोधला होतो. परंतु, हा प्रकार त्याआधी अस्तित्वात होता, असं म्हटलं जातं. मात्र, यासंदर्भात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. गुटेनबर्गने मुद्रा, मातृका व शिशाचा उपयोग करून 40 पानांचे बायबल छापले. गुटेनबर्ग हा जर्मनीत चांदीचा कारागिरीचा होता. इ. स. 1455 साली गुटेनबर्गने चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावला. त्यामुळे मुद्रण पद्धतीत लागणारा वेळ कमी झाला.

इ. स. 1790 च्या सुमाराला विल्यम निकलसन या इंग्रज वैज्ञानिकांनी खिळ्यांवर शाई लावण्यासाठी कातडी आवरणाचा एक रूळ तयार करून तो वापरायला सुरुवात केली. यामुळे अशा यंत्रावर प्रथम चक्रीय गतीचा उपयोग केला गेला. तसचे इंग्लंडमध्ये इ. स 1795 मध्ये प्रथमतः धातूचा उपयोग केलेले मुद्रणयंत्र तयार करण्यात आले.  इ. स. 1880 नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाईप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले. काही दिवसानंतर अलिबागमध्ये ‘सत्यसदन’ नावाचा पहिला छापखाना सुरू झाला. अलिबागमध्ये एकूण 30 छापखाने होते. तसेच इ. स. 1954 मध्ये कुलाबा जिल्ह्यात एकूण 10 मुद्रणालये होती. (हेही वाचा - Hair Care Tips: केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यास मदत करेल 'कढीपत्ता'; जाणून घ्या फायदे)

मुद्रण कलेचा विकास झाल्यानंतर काहीच दिवसांत संगणकावरून कमांड देऊन मुद्रणाचे तंत्र विकसित झाले. त्यामुळे मुद्रण अतिशय सोप्या आणि कमी वेळात पूर्ण होऊ लागले. त्यानंतर काही वर्षीतचं संगणकाच्या विकासासोबतच इंटरनेटचा विकास झाला. इंटरनेटचा विकास झाल्यानंतर हळू-हळू सोशल मीडियाचादेखील विकास होत गेला. अशा पद्धतीने मुद्रण कलेचा विकास होत गेला. आज आपण सोशल मीडिया किंवा संगणकावर अगदी सहजरित्या टाईप करू शकतो. या सर्व विकासामागे अनेक संशोधकांचे कष्ट आहेत. त्यामुळे आज मुद्रण दिनाचे औचित्य साधून त्या सर्व संशोधकांच्या कार्याला लेटेस्ली मराठीकडून सलाम!