संगीत (Music) हा एक असा अमूल्य ठेवा आहे ज्यात सात स्वर आहेत, ताल,सूर, राग, लय या गोष्टी सामावल्या आहेत. अशा गोष्टींनी भरलेले संगीत न केवळ तुमच्या शरीराला शांत करतो तर तुमच्या आत्म्याला, तुमच्या मनाला देखील समरस करून घेतो. सुरेल संगीताने तुमच्या जीवनात खूप चांगले बदल देखील होऊ शकतात अशी एक वेगळीच जादू संगीतामध्ये आहे. ज्याच्या कंठात हा अमूल्य ठेवा त्याच्या गळ्यात देवी सरस्वतीचा सदैव वास आहे असे म्हणतात. अशा या संगीताला समर्पित म्हणून जगभरात जागतिक संगीत दिवस (World Music Day) साजरा केला जातो. या संगीताने मराठी सिनेसृष्टीचा अटकेपार झेंडा रोवला आहे. आतापर्यंत मराठी संगीतात (Marathi Music) एकाहून एक असे सरस प्रयोग करण्यात आले आहे. मग ते दुनियादारी चित्रपटातील जिंदगी गाणे असो वा सैराट मधील 'याडं लागलं' गाणं असो!
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून मराठी संगीताला एक वेगळी ओळख करून देणारी 5 गाणी आणि त्यात करण्यात आलेला प्रयोग या विषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
1. प्रभात गीत (अगं बाई अरेच्चा!)
या गाण्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट पासून कलर च्या जमान्यातील गाणी आणि त्याप्रमाणे शब्द रचना करून संगीत देण्यात आले आहे.
2. तुझे देख की मेरी मधुबाला
या गाण्यामध्ये अवधूत गुप्ते हिंदी आणि मराठी गाण्याचा मेळ करत एक जबरदस्त गाणे तयार केले आहे. World Music Day: संगीत ऐकल्याने तुमच्या शरीरावर होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!
3. जिंदगी (दुनियादारी)
या गाण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील 11 कलाकारांना आवाजात हे भन्नाट गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहेत. हे गाणे कलाकारांनी कलाकारांसाठी गायलेले आहे. असा प्रयोग मराठीत प्रथमच करण्यात आला आहे.
4. याडं लागलं (सैराट)
संगीतकार अजय अतुल यांनी लॉस अँजेलिस मध्ये जाऊन या गाण्याचे रेकॉर्डिंग केले होते. हे भारतीय सिनेमातील पहिले गाणे आहे जे हॉलिवूडमधील सिंम्फनी ऑर्केस्ट्रा मध्ये जाऊन स्वरबद्ध करण्यात आले.
5. लख लख चंदेरी (अॅकेपेला)
मराठी संगीतात a cappella हा प्रयोग प्रथमच करण्यात आला. ज्यात वाद्यांशिवाय गाणे गायले जाते. ज्यात फक्त तोंडानेच वाद्यांप्रमाणे आवाज काढत गाणं गातात.
मराठी संगीतात झालेले हे प्रयोग मराठी संगीताला मानाचे स्थान प्राप्त करुन दिले. सुरेल संगीत ऐकणं हा देखील तुमचे मन एकाग्र करण्याचा वा ध्यानसाधनेचा उत्तम पर्याय आहे. अशा या संगीताचे शरीरावर खूप चांगले परिणाम होतात.