Daughters Day 2021 Marathi Messages: सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कन्या दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस 26 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. आपले मुलं हे प्रत्येक आई-वडीलांसाठी स्पेशल असते. मात्र मुलींबद्दल एक हळवा कोपरा त्यांच्या मनांत असतो. सुंदर, नाजूक, लाघवी अशी मुली आई-वडीलांचे भावविश्व होतात. तीचं आयुष्यात येणं आनंददायी आणि अल्हाददायक असतं. मुलींसोबतचे नाते सेलिब्रेट करणारा दिवस म्हणजे जागतिक कन्या दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर शेअर करुन लाडक्या लेकीचा दिवस खास करा.
पूर्वी मुला-मुलीत भेद केला जात असे. मुलगी म्हणजे डोक्यावर भार तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, असे समजले जात होते. या मानसिकतेपोटी स्त्रीभ्रुण हत्या केली जात असे. अलिकडच्या काळात मानसिकता बदलली असली तरी काही ठिकाणी या मानसिकतेचा मोठा पगडा अद्याप आहे. आजही मुलगा झाल्याने सामाजिक उंची लाभाल्याचे समाधान अनेकींना मिळते. जोपर्यंत स्त्रियांच्याच मनातील हा भेद संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मुलगा-मुलगी समानता समाजात नांदणार नाही.
कन्या दिनाचे शुभेच्छा संदेश:
लेक असते ईश्वराचं देणं,
तिच्या पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं.
जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा!
एक तरी मुलगी असावी,
कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वागत तुझे मी असे करावे,
अचंबित हे सारे जग व्हावे,
तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे.
जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा!
माझा श्वास तू,
माझा जीव तू,
माझ्या जगण्यासाचा अर्थ तू
माझी लाडकी छकुली
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
.लेक म्हणजे आनंदाचा झरा,
लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा
जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा!
खरंतर मुलींना आपल्या कामगिरीत त्या मुलांपेक्षा कमी नाहीत, हे सिद्ध केले आहे. मुलाच्या खांद्याला खांदा लावून मुली अनेक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. काही क्षेत्रात तर मुलांपेक्षाही मुली अव्वल ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांना कुठेही कमी न लेखता त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा द्या. प्रेम, आत्मविश्वास, सुरक्षित वातावरण आणि योग्य सन्मान द्या. जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!