Buddha Purnima 2025 Wishes In Marathi (Photo Credit - File Image)

Buddha Purnima 2025 Wishes In Marathi: वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा ही गौतम बुद्धांची जयंती म्हणून साजरी केली जाते. गौतम बुद्धांचे जन्म नाव सिद्धार्थ गौतम होते. गौतम बुद्ध हे एक आध्यात्मिक नेते होते ज्यांच्या शिकवणींमुळे बौद्ध धर्माचा जन्म झाला. बौद्धांसाठी, बोधगया हे गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. बोधगया व्यतिरिक्त कुशीनगर, लुंबिनी आणि सारनाथ ही इतर तीन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. असे मानले जाते की गौतम बुद्धांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी प्रथम सारनाथ येथे धर्माचे शिक्षण दिले.

यंदा 12 मे ला बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2025) साजरी करण्यात येणार आहे. पंचांगानुसार, वैशाख शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 11 मे रोजी रात्री 8:01 वाजता सुरू होईल. तथापि, पौर्णिमा तिथी 12 मे रोजी रात्री 10:25 वाजता संपेल. या दिवशी लोक एकमेकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Greetings, WhatsApp Status द्वारे बुद्ध पौर्णिच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता.

बुद्धं शरणं गच्छामि,

धम्मं शरणं गच्छामि,

संघं शरणं गच्छामि

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima 2025 Wishes In Marathi 1 (Photo Credit - File Image)

पौर्णिमेच्या तेजाने

तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर होवो

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Buddha Purnima 2025 Wishes In Marathi 2 (Photo Credit - File Image)

सत्याची साथ सदैव देत राहा

चांगले बोला, चांगले वागा

प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima 2025 Wishes In Marathi 3 (Photo Credit - File Image)

जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत,

आपण किती प्रेम केले,

आपण किती शांतपणे जगलो

आणि आपण किती उदारपणे क्षमा केली

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima 2025 Wishes In Marathi 4 (Photo Credit - File Image)

क्रोधाला प्रेमाने,

पापाला सदाचाराने,

लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते… बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima 2025 Wishes In Marathi 5 (Photo Credit - File Image)

सात वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर, भगवान गौतम बुद्धांना बिहारमधील बोधगया येथील बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. मान्यतेनुसार, बुद्धांचे महापरिनिर्वाण देखील याच दिवशी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे झाले होते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि पैसे दान करणे याला खूप महत्त्व आहे.