When is Maha Shivratri 2023? महाशिवरात्री हा एक महत्वाचा हिंदू सण आहे. यंदा 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला येते. महाशिवरात्रीत भगवान शिवाची पूजा केली जाते. धर्मशास्त्रमध्ये भगवान शिव हे सृष्टीचे निर्माते, संरक्षक आहे. अशी धारणा आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे भक्त भक्तिभावाने भगवान शिव पार्वतीची पूजा करतात आणि उपवासही पाळतात, माता पार्वतीने भगवान शिवशी लग्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा उपवास धरला होता. चला तर मग आपण महाशिवरात्रीचे महत्व, मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊया
जाणून घ्या, सविस्तर माहिती
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री असते. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी आहे.
- निशिता कालची वेळ – 18 फेब्रुवारी, रात्री 11.52 ते 12.42 पर्यंत
- उपवासाची वेळ – 19 फेब्रुवारी 2023, सकाळी 06.10 ते दुपारी 02.40 पर्यंत
महाशिवरात्री 2022 महत्व
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. हिंदू पौराणिक कथांनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी लक्ष्मी, इंद्राणी, सरस्वती, गायत्री, सावित्री, सीता, पार्वती आणि रती या देवतांनीही शिवरात्रीचे व्रत केले होते. म्हणूनच भगवान शिवाचे भक्त शिवजींसाठी दिवसभर उपवास करतात.स्त्रिया चांगला वर मिळावा म्हणून व्रत ठेवतात, अविवाहित स्त्रिया माता पार्वतीला जसा इच्छित वर मिळाला म्हणून व्रत केला तसा वर आपल्यालाही मिळावा म्हणून व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया आपल्या नातेसंबंधात शांतता प्रेम समृद्धी आरोग्य इत्यादीच्या कामने साठी व्रत करतात.
महाशिवरात्री 2022 प्रथा आणि विधी
महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त शिवमंदिरांना भेट देतात आणि शिवलिंगाला दूध, फळे, बेलपत्र आणि धतुरा अर्पण करतात. तसेच भक्त ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. भक्त अगरबत्ती, दिवे लावतात, पांढरे वस्त्र, मिठाई, कोणतीही पाच फळे आणि पंचामृत भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करतात. महाशिवरात्रीला भगवान शंकराची ही विधीवत पूजा अहोरात्र चालू असते.