World Food Day: आज जागतिक अन्न दिवस, जाणून घ्या जागतिक अन्न दिवस म्हणजे काय आणि हा दिवस साजरा करण्यामागचं खास कारण
Photo Credit: Pixabay

जागतिक अन्न दिवस (World Food Day) 16 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 16 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (United Nations Food and Agriculture Organization) स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. हंगेरीचे माजी कृषी आणि अन्न मंत्री डॉ पाल रोमनी (Dr. Pal Romani) यांनी नोव्हेंबर 1979 मध्ये जागतिक अन्न दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.  हा विशेष दिवस जागतिक भूक दूर करण्यासाठी आणि जगभरातील भूक निर्मूलनासाठी साजरा केला जातो. अन्न सुरक्षा, भुकमरी मिटवण्याच्या तसेच गरजूंना रोज आवश्यक तेवढ जेवणं मिळावं यांसाठी नियोजन करण्याच्या माध्यमातून विविध थीमसह जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये आज म्हणजेचं 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो.

 

दरवर्षी जागतिक अन्न दिवस (World Food Day) वेगवेगळ्या थीमसह साजरा करण्यात येतो. यावर्षीची थीम आहे लिव्ह नो वन बिहाईंन्ह म्हणजे कुणालाही मागे सोडू नका, सगळ्यांना सोबत घेवून चला. ऐक्याचा, समानतेचा संदेश देणारी यावर्षीची थीम अनोखी आहे. या थीमध्ये कोविड-19 महामारी (Covid19 Pandemic), हवामान बदल (Weather Change), संघर्ष, वाढत्या किंमती आणि आंतरराष्ट्रीय तणाव यासह अनेक जागतिक आव्हानांवर भर देण्यात आला आहे. (हे ही वाचा:- Global Hunger Index: जागतिक भूक निर्देशांकात भारत 101 वरुन 107 व्या क्रमांकावर घसरला;  पाकिस्तान, नेपाळ क्रमवारीत वरचढ)

 

जागतिक भुकेच्या (International Hunger) संकटाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि अन्न हा मूलभूत मानवी हक्क असल्याचा संदेश देण्यासाठी जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात येतो. लोकांना कुपोषण आणि लठ्ठपणाबद्दल शिक्षित करण्यासाठी अनेक जागरूकता उपक्रम देखील आयोजित केले जातात. प्रत्येकाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.