Shri Vitthal Rukmini Darshan 2019: आषाढी वारीनिमित्त भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरु राहणार
श्री. विठ्ठल रुक्मिणी (फोटो सौजन्य- मंदिर वेबसाईट)

Pandharpur Vitthal Rukmini Darshan 2019: आषाढ वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने दरवर्षी भाविक यामध्ये सहभागी होतात. तसेच पायी प्रवास करत असलेल्या वारकऱ्यांना कधी एकदा पंढपुर येथील श्री. विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी आतुरता लागून राहिलेली असते. त्यामुळे आजपासून (4 जुलै) मंदिराकडून 24 तास दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तर गाभाऱ्यात असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या येथे असलेला चांदीचा पलंग काढला असून भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

आज सकाळी पूजा झाल्यानंतर देवाच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापूस लावण्यात आला आहे. तर कटेवर उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. विठ्ठल-रखुमाईचे थेट गाभाऱ्यातून दर्शन आता भाविकांसाठी मिळणार आहे. श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम पुढील संकेतस्थळावर पाहता येईल: http://www.vitthalrukminimandir.org/dinakram.html

तर पहाटे 4.30 वाजता प्रथम देवाचे स्नान आणि पूजा पार पडणार असल्याने मंदिर 1 तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचसोबत दुपारी महानैवेद्याच्या वेळेस 15 मिनिटे थांबवण्यात येणार आहे. मात्र आषाढी वारीसाठी 2019 निमित्त दर्शन रांगेतील भाविकांच्या सोयीसाठी 22 जुलैपर्यंत ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्यात आले असल्याचे मंदिर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.