Types of Khichdi To Eat on Makar Sankranti 2022 for Good Luck: संपूर्ण भारतातील खिचडीच्या वेगवेगळ्या पद्धतीची माहिती
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Wikimedia Commons)

मकर संक्रांती हा नवीन वर्षात साजरा केला जाणारा पहिला सण आहे आणि हिंदू धर्मात हा सण  अत्यंत शुभ मानला जातो. या वर्षी, मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी येईल (ती लीप वर्षात एक दिवस नंतर 15 जानेवारी रोजी येते). मकर संक्रांती मेजवानींशी संबंधित आहे. तिळगुळाचे लाडू, गजक, तिळ रेवडी इत्यादी हिवाळ्यातील मिठाई लोकांना आवडतात. पण सणासुदीच्या वेळी सर्वात जास्त दिसणारा एक स्वादिष्ट पदार्थ म्हणजे खिचडी होय, तांदूळ आणि मसूरी सह तयार केलेले ही प्रसिद्ध पाककृती सर्वांचे आवडते आहे कारण असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने नशीब उजळते, भारतभरातील सहा प्रकारच्या खिचडी आणि पाककृती आहेत ज्या तयार करून मकर संक्रांती 2022 साजरी करा...

 

हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी ज्वाला देवीने एकदा कांगडा येथील तिच्या निवासस्थानी मेजवानीसाठी भगवान शिवाचा पुनर्जन्म असलेले हिंदू देव गोरखनाथ यांच्यासह सर्व संतांना आमंत्रित केले होते. मात्र, या मेजवानीत केवळ मांसाहारी पदार्थांचा समावेश असल्याचे पाहून सर्व संत नाराज झाले. त्यांनी ज्वाला देवीला फक्त 'खिचडी' खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि ज्वाला देवीला पाणी उकळत ठेवण्यास सांगितले आणि त्यांचे भिक्षा पात्र भरले की ते भिक्षा म्हणून खिचडीसाठी साहित्य घेऊन परत येतील असे संतांनी सांगितले. हे ऐकून ज्वाला देवीला वाटले की गोरखनाथ महाराज कदाचित मांसाहारी पदार्थामुळे संतप्त होऊन निघून गेले आहेत आणि मेजवानीसाठी पुन्हा परतणार नाहीत. तरीही ज्वाला देवीने पाणी उकळण्यासाठी ठेवले. दरम्यान, भगवान गोरखनाथ यांनी ज्वाला देवीचे निवासस्थान सोडले आणि खिचडीच्या सामानासाठी गोरखपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला गुरु गोरखनाथ वाटेत एका ठिकाणी ध्यान करीत बसले. त्याच्या शेजारीच त्याचे भिक्षा पात्र ठेवले होते . ते ध्यानात तल्लीन झालेले पाहून लोक त्याच्या भिक्षा पात्रात खिचडी टाकू लागले. त्या दिवशी मकर संक्रांत असल्यामुळे, मकर संक्रांतीच्या दिवशी लोक त्यांच्या भिक्षा पात्रात 'खिचडी' दान करू लागले, परंतु अनेक जणांनी दान देऊनही त्यांचे भिक्षा पात्र भरले नाही. अशी मान्यता आहे की, ज्वाला देवीने ठेवलेले कुंडातले पाणी अजूनही उकळत आहे. मकर संक्रांतीला खिचडी खाल्ल्याने देव गोरखनाथ प्रसन्न होतात अशी धारणा आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील श्री गोरखनाथ मंदिराच्या आवारात महिनाभर खिचडी मेळाही भरतो. मकर संक्रांतीच्या दिवशी हजारो भाविक गोरखनाथ बाबांना खिचडी अर्पण करतात. हा सण शेतकर्‍यांच्या उत्साहाचेही प्रतिनिधित्व करतो, म्हणूनच शेतकर्‍यांच्या प्रयत्नांची आणि योगदानाची दखल घेऊन नवीन कापणी केलेल्या तांदूळ आणि मसूरसह खिचडी तयार केली जाते. मकर संक्रांत २०२२ च्या शुभेच्छा!