
Teachers Day Marathi Wishes: भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंती निमित्त 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक होते. त्यांनी भारतातील आणि आंतरराष्ट्रीय महाविद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून काम केले होते. त्यांच्या सन्मानार्थ 1962 पासून त्यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. विशेष म्हणजे त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे. उद्या भारतभर शिक्षक दिन साजरा होईल. त्यानिमित्ताने तुमच्यासाठी खास मराठी संदेश, Wishes, Messages, Greetings आणि GIF's घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) वरुन हे शुभेच्छा संदेश शेअर करुन तुमच्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा द्या.
प्रत्येकाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर भेटणारे शिक्षक नवा मार्ग दाखवत असतात. त्यांनी सांगितलेल्या लहानसहान सूचना ते मोठाले उपदेश व्यक्ती म्हणून आपल्याला घडवत असतात. शिक्षक दिनानिमित्त त्यांनी अमूल्य ठेव्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुया. (Teachers’ Day 2021 Quotes: शिक्षक दिन निमित्त शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारे सकारात्मक विचार WhatsApp Status, Facebook Messages द्वारा करा शेअर)
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
शिक्षक अपूर्णला पूर्ण करणारा
तत्वातून मुल्य फुलवणारा
शिक्षक म्हणजे निखळ झरा
अखंड वाहत राहणारा...!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्याला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक
अशा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी
योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे
जितकं शरीरासाठी ऑक्सिजन
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
कसं चालावं
याचा धडा देणाऱ्या
शिक्षकरुपी देवमाणसांना नमन!
शिक्षक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

समाजातील प्रत्येक पिढी
घडवण्यात मोलाचा वाटा
असणाऱ्या सर्व गुरुवर्यांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

GIF's
कोविड-19 संकटामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यादानाचे काम अवितरपणे सुरु आहे. या कठीण काळात तर शिक्षकांचे महत्त्व, कार्य अधिकच अधोरेखित झाले आहे. सध्या शाळा, क्लासेस बंद असल्याने यंदाही व्हर्च्युअल माध्यमातूनच शिक्षकांना शुभेच्छा द्याव्या लागणार आहेत. मात्र त्या अगदी न विसरता देऊन शिक्षक दिन खास करा.