Teachers Day Quotes in Marathi: भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers Day) म्हणून साजरा करतात. डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या स्मरणार्थ शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे शिक्षक दिन (Shikshak Din). आई-वडिलांनंतर आपल्या आयुष्याला वळण देणारी अजून एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे शिक्षक. शिक्षकांचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. म्हणूनच त्यांच्या आपल्यावरील ऋणांचा भार थोडा हलका करण्यासाठी आज सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप, फेसबूक द्वारा शिक्षक दिना निमित्त त्यांची महती सांगणारे Quotes शेअर करून आजचा दिवस थोडा स्पेशल करा.(नक्की वाचा: Teachers’ Day 2021 in India: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षक दिन नेमका संबंध काय? जाणून घ्या इतिहास, वैशिष्ट आणि महत्त्व).
मागील वर्ष- दीड वर्षांचा काळ हा शैक्षणिक स्तरावर देखील आव्हानात्मक होता. सध्या शिक्षक ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. यामध्ये ते देखील नव्या आव्हानांचा सामना करत ज्ञानदानाचा वसा पुढे चालवत आहेत. मग आजचा दिवस हा त्यांच्या प्रयत्नांना, नवं काही करू पाहणार्या शिक्षण क्षेत्रातील उमद्या शिक्षकांसाठी थोडा स्पेशल करा आणि ते करत असलेल्या अमोल कामाचं कौतुक करा.
शिक्षक दिन 2021 विचार
शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपतात,
शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना येत्या काळातील आव्हानासाठी तयार करतात. - सर्वपल्ली राधाकृष्णन
शिक्षणाच्या परिणामरूप अशी व्यक्ती घडली पाहिजे जी ऐतिहासिक परिस्थितींमध्ये आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये लढा देऊ शकेल - सर्वपल्ली राधाकृष्णन
विद्यार्थ्यांना आकार देण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते.
आई फक्त जन्म देते शिक्षक माणसाला जीवन देतो - नरेंद्र मोदी
Tell me and I forget. Teach me and I remember. Involve me and I learn. - – Benjamin Franklin
The art of teaching is the art of assisting discovery. – Mark Van Doren
अनेक शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसानिमित्त एक दिवस काही विद्यार्थीच शिक्षक होऊन ज्ञानदान करतात. भारतात हिंदू परंपरेनुसार, व्यास पौर्णिमेला सार्या गुरूजनांचे आभार मानले जातात. त्या दिवशी देखील विद्यार्थी- शिक्षकाचे नाते जपले जाते.