Tanaji Malusare Punyatithi 2021: तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोंढाण्यावरील शौर्यगाथा पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी खास पोवाडा!
Tanaji Malusare | Photo Credits: Wiki

Tanaji Malusare 351 st Punyatithi:  स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकताना प्राणाची बाजी लावणार्‍या नरवीर तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांची आज (4 फेब्रुवारी) पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी पुण्याच्या कोंढण्याला (Kondhana) सर करताना तानाजी मालुसरेंना वीरगती प्राप्त झाली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी आणि सुभेदार तानाजींनी ' आधी लगीम कोंढण्याचं मग माझ्या रायबाचं' असं म्हणत घरात मुलाची लगीनघाई बाजूला सारत शिवरायांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी फत्ते केली होती. दुर्देवाने महाराजांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं म्हणूनच इतिहासात या लढाईची नोंद करताना शिवरायांचे शब्द - 'गड आला पण सिंह गेला' अशा शब्दांत केली जाते. Tanaji Malusare Punyatithi 2021: नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी निमित्त त्यांंना अभिवादन करणारे मराठी HD Images आणि WhatsApp Status.

दरम्यान तानाजी मालुसरे यांच्या जीवनाची कथा आणि कोंढाणा सर करताना घडलेल्या प्रकाराची शौर्यगाथा पोवाड्याच्या माध्यमातूनही सांगितली जाते. यंदा या लढाईची 351 वी वर्षपूर्ती आहे. या निमित्ताने पुढच्या पिढीला तानाजींची शौर्यकथा पोवाड्यातून सांगायची असेल तर हा पोवाडा त्यांना नक्की ऐकवायला हवा.  Tanaji Malusare Death Anniversary: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी काही खास गोष्टी!

तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा

तानाजींच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाण्याचं नाव सिंह गड असे केले आहे. कलेच्या माध्यमातून तानाजींची शौर्यकथा पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी तान्हाजी द अनसंग़ वॉरियर हा सिनेमा देखील झळकला होता. यामध्ये अभिनेता अजय देवगणने प्रमुख भूमिका निभावली होती.