
नरवीर तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुभेदारांपैकी एक. हिंदवी स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंवर सोपावली होती. महाराजांनी दिलेल्या जबाबदारीची त्यांनी पूर्तता तर केली या मोलाच्या कामगिरीमध्ये तानाजी शहीद झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही ' गड आला पण सिंह गेला' अशा शब्दांत त्यावेळी आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या. दरम्यान पुण्यातील कोंढणा सर करताना तानाजींना 4 फेब्रुवारी 1670 दिवशी वीरमरण आले. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त या नरवीर तानाजी मालुसरेंना मानाचा मुजरा करत आदरांजली अर्पण करण्यासाठी तुम्ही लेटेस्टलीच्या टीम कडून करण्यात आलेली काही शुभेच्छापत्र, संदेश सोशल मीडियात व्हॉट्सअॅप मेसेजेस (WhatsApp Messages), स्टेटस (Status), फेसबूक मेसेज (Facebook Messages) यांच्याद्वारा शेअर करू शकता. Tanaji Malusare Death Anniversary: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी काही खास गोष्टी!
तानाजी मालुसरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उंबरठ येथे मामा कडे रहायला गेले. नंतर ते शिवरायांसोबत स्वराज्याच्या उभारणीसाठी शिवाजी महाराजांचे मावळे झाले. त्यांनी कोंढणा किल्ला जिंकण्यासाठीप्राणांची आहुती दिली. आज त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी एक मेसेज नक्की शेअर करा. Tanaji Malusare Punyatithi 2021: तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोंढाण्यावरील शौर्यगाथा पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी खास पोवाडा!
तानाजी मालुसरे पुण्यतिथी निमित्त अभिवादन




शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी कोंढाणा गडाचे नामकरण सिंहगड असे केले. तेथेच त्यांचा पुतळा व स्मारक देखील आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातील उमरठ या त्यांच्या गावामध्येही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.