
Subho Bijoya Dashami 2020 HD Images: देशभरात रविवारी (25 ऑक्टोबर) ला मोठ्या आनंदात आणि उत्साहात दसरा सण साजरा करण्यात आला. देशात प्रत्येक सणाचा उत्साह काही वेगळाच असतो. तसा तो सण साजरा करण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. बंगाली समाजातील लोक शारदीय नवरात्रोत्सवात 5 दिवसीय दुर्गा पूजा (Durga Puja) चा उत्सव साजरा करतात. या 5 दिवस चालणा-या दुर्गा पूजेचा आज शेवटचा दिवस आहे, ज्याला बंगाली लोक बिजोया दशमी (Bijoya Dashami) असे म्हणतात. हिंदू पंचांगानुसार, विजयादशमी (VIjayadashami) चे पर्व आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला येतो. ज्याला देशातील अन्य भागात विजयादशमी असे म्हणतात. बंगाली समाजातील लोकांसाठी बिजोया दशमीचा हा दिवस खूप खास असतो. मात्र यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने हे लोक हा उत्सव साजरा करत आहेत.
त्यामुळे आपल्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून सोशल मिडियाच्या माध्यमातून लोक शुभो बिजोया दशमी असे म्हणत बिजोया दशमीच्या शुभेच्छा देत आहे. अशा या पवित्र सणाच्या खास इंग्रजी आणि हिंदीतून शुभेच्छा:





बिजोया दशमीच्या या पवित्र उत्सवासाठी लोक दुर्गा देवीचे फोटो, ग्रिटिंग्स पाठवून एकमेकांना शुभेच्छा देत आहे. दुर्गा पूजेचा हा उत्सव शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून महाषष्ठीपासून सुरु होतो. या सणाचा आज शेवटचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदात आणि चैतन्यमय वातावरणात जावो हिच प्रार्थना. शुभो बिजोया दशमी!!!