Happy Dussehra 2020 Greetings: विजयादशमी निमित्त शुभेच्छा संदेश WhatsApp Stickers, GIFs, च्या माध्यमातून शेअर करुन व्हर्चुअली घ्या दसऱ्याचा आनंद!
दसरा 2020 | (Photo Credits: File Image)

Happy Dussehra 2020 Wishes: दसऱ्याचा सण मोठा नाही आनंदाला तोटा! खरंच हे अगदी खरे आहे नाही. दसऱ्याचे विशेष महत्त्व भारतीय संस्कृतीत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे अनेक शुभकार्य या मुहूर्तावर केली जाते. यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा सण साजरा केला जाणार आहे. तरी देखील सणाचा आनंद कमी झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया माध्यमातून तुम्ही दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, मेसेजेस, ग्रिटींग्स, HD Images, SMS शेअर करा आणि व्हर्चुअली सणाचा आनंद घ्या. (दसर्‍याच्या शुभेच्छा मराठी संदेश Wishes,Images, WhatsApp Status शेअर करून द्विगुणित करा विजया दशमीचा आनंद!)

दसऱ्यानिमित्त संपूर्ण देशभर आज उत्साहाचे वातावरण आहे. आज घरोघरी सरस्वती, शस्त्र पूजन केले जाईल. नवे कपडे, नवी खरेदी, गोडाधोडाचे जेवण याचा आनंद असेल. तुम्हीही विजयादशमीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट यांना देऊन सणाचा आनंद द्विगुणित करा. (Dussehra 2020 Puja Vidhi: विजयादशमी निमित्त कसे कराल शस्त्रपूजन, सरस्वती पूजन? जाणून घ्या शुभ मुहूर्त)

विजयादशमी च्या शुभेच्छा!

Happy Vijayadashami 2020 (Photo Credits: File Image)
Happy Vijayadashami 2020 (Photo Credits: File Image)
Happy Vijayadashami 2020 (Photo Credits: File Image)
Happy Vijayadashami 2020 (Photo Credits: File Image)

GIF's

via GIPHY

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या विजयादशमी च्या शुभेच्छा!

सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. विजयादशमीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन स्टिकर्स डाऊनलोड करा आणि आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासह शेअर करा. स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सणाच्या उत्साहात कोविड-19 च्या संकटाचा विसर पडू देऊ नका. विशेष खबरदारी घेत सणाचा आनंद लुटा. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठीकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!