Happy Dussehra 2020 Marathi Messages Wishes: नऊ रात्र नऊ दिवसांचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा 25 ऑक्टोबर दिवशी संपणार आहे. विजयादशमी (Vijaya Dashami) अर्थात दसरा (Dussehra) या सणाची सांगता होते. दसरा हा हिंदु धर्मीयांसाठी मोठा जल्लोषाचा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणार्या दसर्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात 'सोनं' एकमेकांना देऊन तो साजरा करण्याची पद्धत आहे. सध्या जगभर कोरोनाचं संकट घोंघावत असताना तुम्ही यंदा आप्तेष्टांना दसरा आणि नवरात्री निमित्त भेटू शकणार नाहीत पण व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही सहाजिकच दसर्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा, विजया दशमीचे मेसेजेस, Sms,Greatings, Wishes, Gifs पाठवून या सणाच्या आनंद सोशल मीडीयाच्या माध्यमातून द्विगुणित करू शकाल. Dussehra Special Rangoli : दसऱ्याला काढा 'या' सुंदर आकर्षक आणि सोप्या रांगोळी .
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने यानिमित्त जेवणात गोडा-धोडाचे पदार्थ, नवे कपडे, घरात फुला-पानांच्या तोरणमाळा असतात. यासोबतच सोने खरेदीसाठी देखील हा मोठा शुभ मुहूर्त असल्याने किमान सोन्याचं वळ किंवा एखादा दागिना खरेदी करतात. पण यंदा सणांमधील धामधूम कमी झाल्याने अत्यंत साधेपणाने दसरा साजरा करताना तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, प्रियजणांना दसर्याच्या शुभेच्छा देताना लेटेस्टली मराठी कडून बनवण्यात आलेली ही शुभेच्छापत्र शेअर करायला विसरू नका.
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
आनंद झाला मनी
उत्सव आज विजयाचा
सीमोल्लंघन करू
मुहूर्त आज दसर्याचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छ!
लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा
घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा
पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा
विजयादशमी निमित्त याच आमच्या शुभेच्छा!
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचं
लुटून सोनं प्रगतीचं
समृद्ध करा आयुष्य तुमचं
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra Wishes in Marathi (File Photo)उत्सव आजचा विजयाचा
दिवस सोनं लुटण्याचा
विसरून सारे जुने वाद
द्विगुणित करू सणाचा आनंद आज!
हॅप्पी दसरा!
हॅप्पी दसरा स्टिकर्स
व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देखील आता तुम्ही दसर्याच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी आता गूगल प्ले स्टोअर वर देखील दसर्याच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पॅक डाऊनलोड करता येईल.
महाराष्ट्रात दसरा जसा सोन्याची पानं एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या जातात. तशाच उत्तर भारतामध्ये रामलीला आणि रावण दहनाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दसर्याला घटस्थापना केलेल्या कलशाचे विसर्जन केले जाते. तसेच देवीच्या मूर्तीलादेखील निरोप दिला जातो. तसेच हा मुहूर्त शुभ असल्याने सोनं खरेदी, बहुमुल्य वस्तूंची खरेदी केली जाते.