Vijayadashami 2020 Wishes In Marathi: साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा मुहूर्त म्हणजे 'दसरा.' या सणादिवशी अनेक शुभकार्य केली जातात. हा दिवस शुभ असल्याने या दिवशी शुभकार्याला सुरुवात करण्यास कोणत्याही विशेष मुहूर्ताची आवश्यकता नसते. दस-याला श्रीप्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आहे. म्हणूनच हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवसांची नवरात्र असते. त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा' (Dussehra). या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देऊन सोनं लुटलं जातं. हा सणाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. आणि एकमेकांची विचारपूस करत आनंदात आणि चैतन्यमय वातावरणात हा सण साजरा करतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे आपल्या सर्वांना सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवायचे असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदा एकत्र येता येणार नाही. हरकत नाही आपण सर्व अशा वेळी डिजिटलच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा संदेश नक्की पाठवू शकतो.
त्यासाठी मेसेजेस, व्हॉट्सअॅप ग्रिटींग्स, इमेजेस च्या माध्यमातून आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता.
अशा वेळी तुम्हाला छान मराठीतून आपल्या आप्तलगांना, आपल्या मित्र परिवाराला दस-याच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर काही मराठमोळे दस-याचे शुभेच्छा संदेश:
तोरण बांधू दारी
रांगोळी काढू अंगणी
एकमेकांस देऊन आपट्याची पाने
नाती जपू मना-मनांची
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी पहाट, सोनेरी पर्व
एकमेकांना देऊन दस-याच्या शुभेच्छा
विसरून जाऊ दु:ख सर्व
विजयादशमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आपट्याची पाने ज्याला हृदयाचा आकार
ज्याने एकमेकांवर बरसू दे प्रेम निराकार
मांगल्याचा हा सण साजरी करण्यासाठी सर्वांचा होकार
विजयादशमी च्या निमित्ताने करावा या शुभेच्छांचा स्वीकार
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव आला विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा
नवे जुने विसरूनी सारे
फक्त आनंद वाटण्याचा
विजयादशमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आला आला दसरा
दु:ख सारे विसरा
एकमेकांस देऊन आपट्याची पाने
केवळ आनंदी-आनंद सर्वत्र पसरा
विजयादशमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा
'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते. अशा या पावित्र्य, संस्कृती जपणा-या दसरा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!