सूर्य ग्रहण 2021 (Photo Credits: Pixabay)

आज देशभरात खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे. तर दिवाळी अमावस्येच्या दिवशी होणार हे याप्रकारचा ग्रहण तब्बल 27 वर्षांनंतर होणार आहे. यापूर्वी 1995 सालच्या दिवाळीला या प्रकारचं सुर्यग्रहण (Solar Eclipse) झालं होतं. तरी तुम्हाला हे सुर्यग्रहण बघायचं असल्यास ते तुमच्या शहरात कुठल्या वेळात बघायचं याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. भारतात (India) खंडग्रास सुर्यग्रहण (Solar Eclips) दिसणार आहे. भारताप्रमाणेचं हे सुर्यग्रहण युरोप(Europe), मध्य पूर्व (Middle East), आफ्रिकेचे उत्तर-पूर्व भाग (Africa North East), पश्चिम आशिया (West Asia), उत्तर अटलांटिक महासागर (North Atlantic Ocean) आणि उत्तर हिंद महासागर (North Indian Ocean) या प्रदेशात दिसणार आहे. तरी सुर्यास्तापूर्वी (Sunset) हे सुर्यग्रहण भारतातील विविध शहरात वेगवेगळ्या वेळात दिसणार आहे. तरी नागरिकांनी हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असं तज्ञांनी सांगितलं आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघितल्यास डोळ्याचे गंभीर नुकसान होवू शकते,असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

 

कोल्हापूर  सूर्यग्रहण प्रारंभ 04 वाजून 47 मिनिटे ते संध्याकाळी 06 वाजून 05 मिनिटांपर्यत हे ग्रहण दिसणार आहे. तर मुंबईत सूर्यग्रहण प्रारंभ 05 वाजून 49 मिनिटे ते ग्रहण मोक्षकाळ संध्याकाळी 06 वाजून 06 मिनिटांपर्यत असणार आहे. पुण्यात 04 वाजून 51 मिनिटे ते संध्याकाळी 06 वाजून 03 मिनिटांनी संपणार आहे. ठाण्यात सूर्यग्रहण प्रारंभ 05 वाजून 49 मिनिटे ते ग्रहण मोक्षकाळ संध्याकाळी 06 वाजून 06 मिनिटांपर्यत असणार आहे. तर नाशकात सूर्यग्रहण प्रारंभ 04 वाजून 47 मिनिटे ते ग्रहण मोक्षकाळ संध्याकाळी 06 वाजून 02 मिनिटांनी संपणार आहे. (हे ही वाचा:- Surya Grahan 2022 Sutak Timings: 25 ऑक्टोबरच्या सूर्यग्रहणात सुतक काळ पहा किती वेळ पाळायचा?)

 

सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी होते जेव्हा चंद्र (moon) पृथ्वी (earth) आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तीन वस्तू एका संरेखित केल्या जातात. जेव्हा चंद्र सौर डिस्कला अर्धवट झाकतो तेव्हा आंशिक सूर्यग्रहण होते.आज सकाळी ११ वाजून २८ मिनिटापासून सूर्यग्रहण सुरू झाले असून ते संध्याकाळी ०६ वाजून ३३ मिनिटा पर्यंत चालणार आहे. पण भारतात हे ग्रहण ०४ वाजून २२ मिनिटा पासून दिसणार आहे आणि ०५ वाजून २६ मिनिटापर्यंत राहील.